गुपचूपपणे लाँच झालेला 'हा' स्मार्टफोन देणार Jio Phone Next ला टक्कर

नवी दिल्ली: Itel ने भारतात आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर केला आहे. itel A27 मध्ये ५. ४५ इंचाचा IPS डिस्प्ले आहे. याशिवाय यामध्ये ड्युअल 4G VoLTE सपोर्ट करण्यात आला आहे. हा फोन Android 11 च्या Go एडिशनसह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉकशिवाय फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. itel a27 पुढे जिओ फोनशी स्पर्धा करते. itel A27 किंमत सर्वांना परवडेल अशी आहे. तुम्ही हा फोन ५,९९९ रुपयांमध्ये घरी आणू शकता. हा फोन एकाच प्रकारात सादर करण्यात आला आहे. म्हणजे, २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज. itel A27 तीन रंगांमध्ये क्रिस्टल ब्लू, डीप ग्रे आणि सिल्व्हर पर्पल कलरमध्ये खरेदी करता येईल. itel A27 मध्ये Android 11 Go Edition देण्यात आले आहे. यात ५.४५ इंचाचा FW+ IPS डिस्प्ले आहे. फोनमध्ये १.४GHz क्वाड-कोर प्रोसेसर आहे. वाचा: ज्याच्या मॉडेलबद्दल कंपनीने माहिती दिलेली नाही. itel A27 मध्ये २ GB RAM सह ३२ GB स्टोरेज मिळेल, जे मेमरी कार्डच्या मदतीने १२८ GB पर्यंत वाढवता येईल. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, itel A27 मध्ये ५-मेगापिक्सलचा AI रियर कॅमेरा आहे आणि समोर २-मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फीसाठी देण्यात आला आहे. itel A27 फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर दोन्ही आहेत. itel A27 मध्ये ४०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. इतक्या कमी किमतीत सादर करण्यात आलेला itel चा हा फोन थेट जिओच्या पहिल्या स्मार्टफोन Jio Phone Next शी स्पर्धा करतो. ची किंमत आणि फीचर्स: JioPhone Next मध्ये ५.४५ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१० प्रोसेसर आणि प्रगती ओएस दिले आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे.या स्मार्टफोनमध्ये रियरला १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. कॅमेऱ्यात अनेक वेगवेगळे मोड्स दिले आहेत. यात नाइट मोड, पोट्रेट मोड आणि एचडीआर मोडचा समावेश आहे. कॅमेऱ्यासोबत स्नॅपचॅटचा डायरेक्ट अ‍ॅक्सेस मिळतो. यात पॉवरसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Jio Phone Next ची किंमत ६,४९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NWjltdM

Comments

clue frame