अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा झक्कास फीचर्स असणारा Infinix चा 5G स्मार्टफोन, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन निर्माता Infinix चा नवीन स्मार्टफोन, भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला असून हा कंपनीचा पहिला 5G स्मार्टफोन आहे. जो, तुम्ही Flipkart वरून २४,९९९ रुपयांऐवजी केवळ ३,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या भारी डीलबद्दल आणि या 5G स्मार्टफोनच्या आश्चर्यकारक वैशिष्ट्यांबद्दल सर्वकाही जाणून घेऊया. स्मार्टफोन ब्रँड Infinix ने आपला पहिला 5G स्मार्टफोन, Infinix Zero 5G, काल म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी बाजारात विक्रीसाठी लाँच केला. २४,९९९ रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन तुम्ही २० % च्या सवलतीनंतर फ्लिपकार्टवरून खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. खरेदी करताना Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला ५ % म्हणजेच एक हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. वाचा: कॅशबॅकमुळे तुमच्यासाठी Infinix Zero 5G फोनची किंमत १८,९९९ रुपये होईल. स्मार्टफोन असा ३,४९९ रुपयांना खरेदी करा: या स्मार्टफोन डीलमध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात Infinix Zero 5G खरेदी करून तुम्ही १५,५०० पर्यंत सूट मिळवू शकता. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुम्ही हा 5G स्मार्टफोन Infinix Smartphone १८,९९९ रुपयांऐवजी ३,४९९ रुपयांमध्ये घेऊ शकता आणि मोठ्या प्रमाणात बचतही करू शकता. Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच FHD+ LTPS डिस्प्ले सपोर्ट दिला आहे. फोनचे पीक ब्राइटनेस ५०० नीट्स आहे. फोनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. याशिवाय, फोनमध्ये टच सँपलिंग रेट २४० हर्ट्जचा सपोर्ट दिला आहे. Infinix Zero 5G चा स्क्रीन टू बॉडी रेशियो ९२ टक्के आहे. Infinix Zero 5G मध्ये लेटेस्ट ६ एनएम बेस्ड ऑक्टाकोर डायमेंसिटी ९०० प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला असून, हा फोन अँड्राइड ११ आधारित XOS १०.० वर काम करतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय, १३ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेंस आणि २ मेगापिक्सल बोकेह लेंस आहे. फोनमध्ये ३० एक्स झूमचा सपोर्ट मिळतो. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा AI कॅमेरा दिला आहे. जो, ड्यूल फ्लॅश लाइट सपोर्टसह येतो. पॉवर बॅकअपसाठी यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देखील देण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QJLOsdR

Comments

clue frame