सुपरहिट प्लान ! ४०० रुपयांपेक्षा कमीमध्ये 'ही' कंपनी देतेय ४० GB डेटासह १५० GB एक्स्ट्रा डेटा फ्री, सोबत अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या आजकाल ग्राहकांच्या आवडीनुसार अनेक प्लान्स ऑफर करतात. बहुतेक युजर्स प्रीपेड प्लान्स वापरत असले तरी पोस्टपेड प्लान्सना प्राध्यान्य देणारे देखील अनेक युजर्स आहेत. हे लक्षात घेता, दूरसंचार कंपनी Vodafone-Idea (Vi) काही उत्कृष्ट पोस्टपेड प्लान्स ऑफर करत आहे. नामांकित टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea चा ३९९ रुपयांचा प्लान त्यापैकी एक आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना ४० जीबी डेटासह १५० जीबी अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. तुम्हाला जर हे प्लान्स खरेदी करायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला Vodafone-Idea च्या काही पोस्टपेड प्लान्सची माहिती देणार आहो. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि बेस्ट बेनिफिट्स देणाऱ्या प्लान्सची निवड करू शकाल. वाचा: व्होडाफोन आयडियाचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान: व्होडाफोन-आयडियाचा हा पोस्टपेड प्लान सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लानपैकी एक आहे. या प्लानमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी ४० जीबी डेटा देत आहे. विशेष बाब म्हणजे, व्होडाफोन आयडियाच्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये तुम्हाला १५० GB अतिरिक्त फ्री डेटासह २०० GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर लाभही मिळेल. व्होडाफोन आयडियाच्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये १०० मोफत एसएमएस मासिक आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. कंपनी या प्लानच्या सदस्यांना Vi Movies आणि TV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. Vodafone-Idea चा ४९९ रुपयांचा प्लान: या पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी ७५ जीबी डेटा देत आहे. हा प्लान २०० GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिटसह येतो. प्लानमध्ये मासिक १०० मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील दिले जात आहे. कंपनीचा हा प्लान Amazon Prime आणि Disney + Hotstar च्या एका वर्षाच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. Vodafone-Idea चा ६९९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये कंपनी यूजर्सना इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत कॉलिंग आणि मासिक १०० मोफत एसएमएस मिळतील. कंपनी या प्लानमध्ये Amazon Prime Video आणि Disney + Hotstar वर एका वर्षासाठी मोफत प्रवेश देखील देत आहे. तुम्हाला जर प्रीपेड प्लान्स खरेदी करायचे असतील तर VI कडे १७९ रुपये किंमतीत येणारा सर्वात स्वस्त प्लान उपलब्ध आहे. १७९ रुपयांचा हा प्रीपेड प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा मिळतो. यात २८ दिवसांसाठी एकूण ३०० मोफत एसएमएस मिळतील. तसेच, वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा देखील मोफत अ‍ॅक्सेस कंपनी देत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hI62kwp

Comments

clue frame