Flipkart सेलचा धमाका! फक्त २४ हजारात तुमचा होईल ‘हा’ ५५ इंच शानदार स्मार्ट टीव्ही, पाहा ऑफर

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म वर सातत्याने नवनवीन सेलचे आयोजन केले जात आहे. Flipkart वर कालपासून म्हणजे ६ फेब्रुवारीपासून एक खास सेल सुरू झाला आहे. हा सेल १० फेब्रुवारीपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्हाला अनेक लोकप्रिय ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीला स्वस्तात खरेदी करता येईल. Flipkart TV Days सेलमध्ये च्या स्मार्ट टीव्हीला तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये HiSense चा ५५ इंच ४९,९९० रुपयांऐवजी फक्त २३,४९९ रुपयात तुम्ही घरी नेऊ शकता. या टीव्हीवर तुम्हाला बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. हा टीव्ही स्वस्तात कसा खरेदी करू शकता, याविषयी जाणून घेऊया. वाचा: HiSense A71F 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV वर आकर्षक ऑफर HiSense A71F 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV ची मूळ किंमत ४९,९९० रुपये आहे. परंतु, सेलमध्ये २१ टक्के डिस्काउंटनंतर ३८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीवर कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय कोणत्याही बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगने पेमेंट केल्यास ३ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. या ऑफरचा लाभ मिळाल्यास टीव्ही ३४,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवरून टीव्ही खरेदी करताना एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. HiSense च्या या ५५ स्मार्ट टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण लाभ मिळाल्यास ४९,९९० रुपयांच्या या टीव्हीला तुम्ही फक्त २३,४९९ रुपयात घरी नेऊ शकता. स्मार्ट टीव्हीचे खास फीचर्स HiSense A71F 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV हा अँड्राइडवर काम करतो. या टीव्हीमध्ये ५५ इंच शानदार अल्ट्रा एचडी (4K) डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आहे. या टीव्हीमध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि ३० वॉटचा साउंड आउटपूट सपोर्ट दिला आहे. HiSense च्या या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि युट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. दरम्यान, ६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या Flipkart TV Days सेलचा आज दुसरा दिवस आहे. हा सेल १० फेब्रुवारीपर्यंत चालेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/o0ZYftq

Comments

clue frame