Flipkart आणि Amazon पेक्षा स्वस्तात प्रोडक्ट्स विकत आहे ‘ही’ वेबसाइट, किंमत निम्म्यापेक्षा कमी

नवी दिल्ली: आज स्मार्टफोनच्या एका क्लिकवर अनेक गोष्टी सहज करणे शक्य आहे. तुम्ही घरबसल्या दुकानात न जाता सहज वेबसाइटवरून वस्तू खरेदी करू शकता. ऑनलाइन शॉपिंग करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रोडक्ट्सवर मिळणारे डिस्काउंट. वेगवेगळ्या ऑफर्सचा फायदा घेऊन आपण वस्तू खरेदी करतो. अनेक ऑनलाइन शॉपिंग साइट्स उपलब्ध असल्या तरीही आपल्यापैकी बहुतांशजण आणि ला प्राधान्य देतात. या वेबसाइट्सवर बंपर डिस्काउंट मिळते. तसेच, प्रोडक्ट्स कमी किंमतीत उपलब्ध असल्याने ग्राहक या वेबसाइट्सला पसंती देतात. वाचा: मात्र, तुम्हाला Flipkart आणि Amazon पेक्षा अजून स्वस्तात प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास एक शानदार वेबसाइट उपलब्ध आहे. या वेबसाइटवर अर्ध्या किंमतीत वस्तू मिळत आहे. या वेबसाइटबद्दल बहुतांश यूजर्सला माहिती नाही. ज्या यूजर्सला ही वेबसाइट माहिती आहे, ते बंपर डिस्काउंटसह प्रोडक्ट्स खरेदी करत आहेत. या वेबसाइटचने नाव आहे Shopsy. नावाची ही ई-कॉमर्स साइट, अनेक मोठमोठ्या साइट्सला टक्कर देत आहे. या वेबसाइटवर एवढ्या कमी किंमतीत वस्तूची विक्री होत आहे की तुमचा विश्वासच बसणार नाही. अनेकदा वस्तू एवढ्या स्वस्तात मिळते की, याची किंमत मूळ किंमतीपेक्षा निम्मी असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण Shopsy ही फ्लिपकार्टच्याच मालकीची एक ई-कॉमर्स साइट आहे. यावर फ्लिपकार्टपेक्षा कमी किंमतीत प्रोडक्ट्स उपलब्ध आहे. या वेबसाइटचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही खरेदी करण्यासोबतच कमाई देखील करू शकता. Shopsy वरून खरेदी केलेल्या प्रत्येक ऑर्डरवर तुम्ही कमाई करू शकता. तसेच, या ई-कॉमर्स साइटवरून प्रोडक्ट खरेदी केल्यास सुपर फास्ट डिलिव्हरी देखील मिळते. तुम्ही जर आतापर्यंत या साइटला भेट दिली नसल्यास एकदा जाऊन प्रोडक्ट्सच्या किंमती नक्कीच पाहायला हव्यात. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/28R7NXj

Comments

clue frame