नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला आपल्या यूजर्सला कमी किंमतीत अनलिमिटेड रिचार्ज प्लान्स उपलब्ध करण्यासाठी ओळखले जाते. प्रतिस्पर्धी टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत कडे एकापेक्षा एक शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. आपल्या प्लानमध्ये डेटा, कॉलिंगसह अतिरिक्त बेनिफिट्स देखील देत आहे. कंपनीकडे अगदी १४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटापासून ते ३ जीबी डेटाचा फायदा मिळेल. कंपनीकडे असाच एक स्वस्त रिचार्ज प्लान असून, ज्याची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनी या प्लानसोबत ग्राहकांना कॉलिंग आणि डेली डेटासह अनेक सुविधा प्रदान करत आहेत. कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणाऱ्या या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा जिओचा १८६ रुपयांचा प्लान टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या १८६ रुपयांच्या जिओफोन प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा दिला जात आहे. डेली डेटा समाप्त झाल्यानंतर यूजर्स ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवस आहे. म्हणजेच, या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २८ जीबी डेटाचा फायदा मिळेल. डेटा व्यतिरिक्त या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. म्हणजेच ग्राहक २८ दिवस देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय या प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएसचा देखील फायदा ग्राहकांना मिळेल. प्लानमध्ये जिओ मूव्ही, जिओ सिक्योरिटी, जिओ क्लाउट सारख्या जिओ अॅप्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वाचा : वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LtF4Ay6
Comments
Post a Comment