नवी दिल्ली: करोना व्हायरस महामारीमुळे सुरू झालेल्या आणि ऑनलाइन क्लासेसमुळे हाय-स्पीड इंटरनेटची गरज भासते. अनेकदा मोबाइल डेटावर काम करणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याशिवाय पर्याय नसतो. गेल्या दोन वर्षात ब्रॉडबँड कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील स्वस्त व हाय-स्पीड डेटा प्रदान करणारे प्लान्स शोधत असाल तर सरकारी टेलिकॉम कंपनी कडे असेच तीन स्वस्त उपलब्ध आहेत. या सर्वात स्वस्त ्समध्ये तुम्हाला हाय-स्पीड डेटासह अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. BSNL कडे २९९ रुपये, ३९९ रुपये आणि ५५५ रुपये किंमतीचे स्वस्त प्लान्स आहेत. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: BSNL चा २९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान BSNL च्या २९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये ग्राहकांना १०० जीबी डेटा दिला जात आहे. या डेटासह तुम्हाला १० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर हा स्पीड २ एमबीपीएस होईल. याशिवाय तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. जर तुम्ही दररोज ३ जीबी अथवा त्यापेक्षा थोडा अधिक डेटा वापरत असाल तर हा प्लान तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. तुम्ही जर घरून काम करत असाल तर हा प्लान तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. BSNL चा ३९९ रुपये आणि ५५५ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान बीएसएनलच्या ३९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये दुप्पट डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दरमहिन्याला २०० जीबी डेटा डेटा दिला जात आहे. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर तुम्ही २ एमबीपीएसच्या स्पीडने वापरू शकता. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, कंपनीच्या ५५५ रुपयांच्या प्लानमध्ये जास्त डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये एक महिन्यासाठी ५०० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये १० एमबीपीएसच्या स्पीडने नेट वापरू शकता. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर तुम्ही २ एमबीपीएसच्या स्पीडने नेट वापरू शकता. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तुम्ही दिवसाला १६ जीबी डेटा जरी खर्च केला तरीही हा प्लान तुमच्या फायद्याचा ठरेल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6WXTSZP
Comments
Post a Comment