‘या’ कंपनीच्या स्वस्त प्लान्समध्ये मिळतायत भन्नाट बेनिफिट्स, फक्त ४ रुपये जास्त खर्चून मिळेल दुप्पट वैधता

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी () आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान्स ऑफर करत असते. कंपनीकडे अगदी महिन्याभरापासूनचे ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे वेगवेगळ्या किंमतीसह येणारे रिचार्ज उपलब्ध असून, यात मिळणारे फायदे देखील जबरदस्त आहेत. कंपनीकडे असेच दोन रिचार्ज प्लान्स आहेत, ज्यांच्या किंमतीत फक्त ४ रुपयांचा फरक आहे. मात्र, एका प्लानमध्ये यूजर्सला २८ दिवस, तर दुसऱ्या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. त्यामुळे तुम्ही जर जास्त वैधतेसह येणारे प्लान शोधत असाल, तर हे रिचार्ज तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Vi चा ४७५ रुपयांचा प्लान टेलिकॉम कंपनी वीआयकडे ४७५ रुपये किंमतीचा एक रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. यात दररोज ३ जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. यात Binge All Night आणि Weekend Roll Over ची सुविधा दिली जात आहे. Binge All Night अंतर्गत यूजर्स रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मोफत इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात. तर, वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान वाचलेल्या डेटाला शनिवार व रविवारी वापरता येईल. तुम्ही जर दररोज जास्त डेटा वापरत असाल तर ४७५ रुपयांचा प्लान तुमच्यासाठी योग्य ठरेल. मात्र, तुम्हाला जास्त वैधता हवी असल्यास फक्त ४ रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील. ४ रुपये जास्त खर्च केल्यास तुम्हाला २८ दिवसांऐवजी थेट ५६ दिवसांची वैधता मिळेल. कंपनीकडे ४७९ रुपये किंमतीचा प्लान असून, यामध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच, दररोज १.५ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये देखील Binge All Night आणि Weekend Roll Over सारखे अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतात. वाचा: वाचा: वाचा


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IfvsOSQ

Comments

clue frame