नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असल्यास थोडं थांबा,'ही' कंपनी लवकरच लाँच करणार दोन स्वस्त स्मार्ट टीव्ही

नवी दिल्ली: तुमच्या घरी स्मार्ट टीव्ही नसेल आणि तो खरेदी करण्याची जर तुमची इच्छा असेल तर लवकरच तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. अनेकदा बऱ्याच ग्राहकांना जास्त किमतीमुळे मॉडर्न स्मार्ट टीव्ही खरेदी करता येत नाही. तुम्हीही त्यापैकी एक असाल तर आता काळजीचे कारण नाही. नामांकित कंपनी पुढील महिन्यात दोन नवीन स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे. हे टीव्ही ३२-इंच आणि ४० -इंच आकारात येतील. हे टीव्ही Infinix X3 स्मार्ट टीव्ही म्हणून ओळखले जातील . स्मार्ट टीव्ही Android TV 11 सह येतील आणि मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ग्राहकांसाठी बाजारात लाँच केले जातील. या स्मार्ट टीव्हीची किंमत बजेट रेंजमध्ये ठेवली जाणार असल्याचे चीनी स्मार्टफोन कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. Infinix X3 हा भारतातील ट्रान्स्शन होल्डिंग्स ब्रँडसाठी दुसरा स्मार्ट टीव्ही लाइन-अप असेल. वाचा: ऑनलाइन-केंद्रित स्मार्टफोन असल्याने, Infinix हे स्मार्ट टीव्ही Flipkart द्वारे लाँच करण्याची शक्यता आहे. Infinix X3 मध्ये हे खास असेल: याव्यतिरिक्त, लाइनअपमध्ये दोन मॉडेल समाविष्ट असतील जे ३२ -इंच आणि ४०-इंच असतील. कंपनीने अद्याप डिस्प्ले रिझोल्यूशनचा खुलासा केलेला नाही. परंतु, टीव्ही HD-रेडी (१३६६ x ७६८ पिक्सेल) पॅनेलसह येईल अशी अपेक्षा आहे. तर नंतरचे FHD (१९२० x १०८० पिक्सेल) रिझोल्यूशन ऑफर करेल. Infinix ची नवीन स्मार्ट टीव्ही मालिका Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टम बूट करेल. इतरही काही भन्नाट फीचर्स या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना मिळू शकतात. Ininfix X1 ची वैशिष्ट्ये: या अपकमिंग स्मार्ट टीव्हीच्या फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, Infinix X1 , Infinix X3 कमी-अधिक प्रमाणात Infinix X1 सारखाच असेल. दुसऱ्या शब्दांत, ही स्वस्त स्मार्ट टीव्हीची आणखी एक Series असेल. Ininfix X1 देखील ४३ -इंचाच्या प्रकारात येतो. Infinix X3 ची ही आवृत्ती नंतर रिलीज होऊ शकते. परंतु, सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. Infinix कडे X1 Android TV च्या रूपात भारतात फक्त एक स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहे. Infinix चा सध्याचा स्मार्ट टीव्ही X1 ३२-इंच, ४०-इंच आणि ४३-इंच आकारात येतो. स्मार्ट टीव्हीमध्ये MediaTek 64-बिट प्रोसेसर आणि 24W स्पीकर आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1roeX09

Comments

clue frame