फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर! २९ हजारांचा सॅमसंगचा फ्रिज फक्त १० हजारात घेवून जा घरी; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणत असते. सध्या फ्लिपकार्टवर १८ फेब्रुवारीपासून नावाने एक सेल सुरू झाला आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही फ्रिज, कुलर, एअर एसी सारख्या कूलिंग अ‍ॅप्लायन्सेजला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. लवकरच उन्हाळा सुरू होणार असून, या निमित्ताने या सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या प्रोडक्ट्सवर देखील बंपर डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. या सेलमध्ये च्या २५३ लीटर फ्रिजवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. ऑफर्सचा लाभ मिळाल्यास तुम्ही २९ हजार रुपयांच्या या फ्रिजला १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी नेऊ शकता. या ऑफरविषयी जाणून घेऊया. वाचा: Samsung च्या फ्रिजवर आकर्षक ऑफर Samsung 253L Frost Free Double Door ची मूळ किंमत २८,९९० रुपये आहे. मात्र, कूलिंग डेज सेलमध्ये हा फ्रिज १५ टक्के डिस्काउंटनंतर फक्त २४,४९० रुपयात उपलब्ध आहे. तसेच, तुम्ही तुमचा जुना फ्रिज दिल्यास यावर १२ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देखील मिळेल. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण लाभ मिळाल्यास या फ्रिजला फक्त १२,४९० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय आकर्षक बँक ऑफरचा देखील फायदा मिळेल. Samsung 253L Frost Free Double Door Refrigerator ला खरेदी करताना कोणत्याही बँकेच्या कार्डचा वापर केल्यास ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तसेच, अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के म्हणजे २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे सर्व ऑफर्सचा लाभ मिळाल्यास या फ्रिजला तुम्ही फक्त ९,९९० रुपयात घरी नेऊ शकता. Samsung 253L Frost Free Double Door Refrigerator चे स्पेसिफिकेशन्स Samsung 253L Frost Free Double Door Refrigerator एक फ्रॉस्ट फ्री फ्रिज आहे, जो २५३ लीटरच्या कॅपेसिटीसह येतो. जर तुमच्या कुटुंबात तीन अथवा पाच सदस्य असतील तर हा फ्रिज एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला डिजिटल इंव्हर्टर कंप्रेसरची सुविधा मिळेल. हा तीन स्टारसह येणारा फ्रिज आहे. याद्वारे ३५ टक्क्यांपर्यंत विजेचा वापर कमी होतो. या डबल डोर फ्रिजची उंची १५४५ एमएम, खोली ६३७ एमएम, रुंदी ५५५ एमएम आणि वजन ४६ किलो आहे. तसेच, कंपनी प्रोडक्टवर १ वर्षाची आणि सॅमसंगच्या कंप्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी देत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/m8IZrkN

Comments

clue frame