‘या’ कंपनीने स्वस्तात लाँच केले मस्त इयरबड्स, किंमत फक्त १,४९९ रुपये

नवी दिल्ली: ला कमी किंमतीत शानदार ऑडिओ डिव्हाइस लाँच करण्यासाठी ओळखले जाते. कंपनीने आता आपल्या लाइनअपचा विस्तार करत भारतात एक नवीन वायरलेस इयरबड्सला लाँच केले आहे. कंपनीने ला सादर केले आहे. हे डिव्हाइस जुन्या २०२१ च्या मॉडेलच्या तुलनेत शानदार फीचर्ससह येते. Boult AirBass Z1 मध्ये अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. Boult AirBass Z1 मध्ये Type-C फास्ट चार्जिंग आणि २४ तासांचा प्लेबॅक टाइम यासारखे फीचर्स मिळतात. या बड्सला सहज कोठेही घेऊन जाऊ शकता. वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी याला आयपीएक्स५ रेटिंग दिले आहे. हे डिव्हाइस पॅसिव्ह नॉइज कॅन्सिलेशन फीचरसह येतात. वाचा: Boult AirBass Z1 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.१ चा सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा सिंगल चार्जमध्ये ६ तासांचा प्लेबॅक टाइम प्रदान करतात. या डिव्हाइसची किंमत फक्त १,४९९ रुपये आहे. Boult AirBass Z1 ला तुम्ही ई-कॉमर्स साइट वरून खरेदी करू शकता. Boult AirBass Z1 मध्ये १० एमएम डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहेत. याद्वारे एक्स्ट्रा पॉवरफुल बेस आणि वोकल क्लिअरिटी मिळतील. याद्वारे यूजर्सला शानदार ऑडिओ एक्सपीरियन्स मिळतो. Boult AirBass Z1 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी दिलेल्या ब्लूटूथ वी५.१ ची रेंज १० मीटरपर्यंत आहे. हे डिव्हाइसला त्वरित कनेक्ट होतात. प्लॅबॅक टाइमबद्दल सांगायचे तर Boult AirBass Z1 मध्ये चार्जिंग केससह २४ तासांचा प्लेबॅक टाइम दिला आहे. हे TWS बड्स फास्ट चार्जिंग सपोर्ट करतात. कंपनीचा दावा आहे की, केवळ १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये याचा १०० मिनिटं वापर करू शकता. तुम्हाला गाणी ऐकण्याची किंवा गेम खेळण्याची आवड असल्यास Boult AirBass Z1 बड्स एक चागंला पर्याय ठरतील. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/10pI5Ra

Comments

clue frame