कमी किंमतीत जास्त फायदे! जबरदस्त बेनिफिट्ससह येणारे Airtel चे ‘हे’ प्लान्स एकदा पाहाच, किंमत १७९ रुपयांपासून सुरू
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार प्लान्स ऑफर करत आहे. एअरटेलकडे स्वस्त प्लान्सची मोठी रेंज आहे. या प्लान्समध्ये यूजर्सला केवळ डेटा, कॉलिंग, एसएमएस नाही तर अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. कंपनीकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे काही चांगले प्लान्स उपलब्ध आहे. या प्लान्सची किंमत ६०० रुपयांपेक्षा कमी आहे. ६०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत एअरटेलकडे १७९ रुपये, २९९ रुपये, २६५ रुपये आणि ५९९ रुपयांचे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Airtel चा १७९ रुपये आणि २९९ रुपयांचा प्लान Airtel कडे १७९ रुपयांचा स्वस्त प्लान उपलब्ध आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा मिळत आहे. याशिवाय प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, कंपनीच्या ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. कंपनीकडे २९९ रुपयांचा देखील प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा देखील फायदा मिळतो. Airtel चा २६५ रुपये आणि ५९९ रुपयांचा प्लान Airtel च्या २६५ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. कंपनीकडे ५९९ रुपयांचा देखील प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज ३ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय दररोज १०० एसएमएस आणि देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी अतिरिक्त बेनिफिट्स देखील देत आहे. या प्लानमध्ये Disney+ Hotstar आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. याची वैधता २८ दिवस आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KLXA4mn
Comments
Post a Comment