Upcoming Smartphones : हा आठवडा ठरेल स्मार्टफोन युजर्ससाठी महत्वाचा, लाँच होतील हे बहुचर्चित स्मार्टफोन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात काही भन्नाट स्मार्टफोन्सनी बाजारात एन्ट्री घेतली. त्याचप्रमाणे या आठवड्यात देखील भारतासह जागतिक बाजारपेठेत अनेक उत्कृष्ट स्मार्टफोन दाखल होणार आहेत. Redmi Note 11 सीरीजची बरीच चर्चा असून देशांतर्गत स्मार्टफोन ब्रँड मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन देखील एन्ट्री करणार आहे. या व्यतिरिक्त, Vivo चा 5G स्मार्टफोन Vivo Y75 हा या आठवड्याचा हायलाइट लाँच असेल. या सर्व स्मार्टफोन्सच्या लाँचपासून किंमत आणि स्पेसिफिकेशन्सपर्यंतचे संभाव्य तपशील जाणून घेऊया. वाचा: Micromax In Note 2: लाँच तारीख- २५ जानेवारी २०२२, अपेक्षित किंमत - १५,००० रुपये स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर काचेचा वापर केला जाईल. फोन पातळ बेझल्ससह पंच-होल डिस्प्लेसह येतो. Micromax In Note 2 स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून होणार आहे. हा फोन ब्लू आणि ब्राउन या दोन रंगात येईल. फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. ब्रँडिंगमध्ये फोनच्या मागील बाजूस वापरण्यात आला आहे. फोनबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. : लाँच तारीख - २६ जानेवारी २०२२, अपेक्षित किंमत - २२,९९० रुपये Xiaomi कंपनी Redmi Note 11 सीरीज अंतर्गत तीन हँडसेट २६ जानेवारी रोजी जागतिक बाजारात लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro 5G असतील. रेडमी नोट 11 सीरीज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेटसह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात येऊ शकते. Redmi Note 11 सीरीजच्या जागतिक लाँचसह, कंपनी लवकरच Redmi Note 11S स्मार्टफोन भारतात लाँच करू शकते. Vivo Y75 5G: लाँच तारीख - २६ जानेवारी २०२२, अपेक्षित किंमत - १५,९९० रुपये स्मार्टफोन डायमेंशन ७०० चिपसेटसह येईल. फोन ७nm आधारित ऑक्टा-कोर चिपसेट सपोर्टसह येईल. Vivo Y75 5G स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह ऑफर केला जाईल. त्याचा मुख्य कॅमेरा ४८-मेगापिक्सलचा असेल. याशिवाय, ५० -मेगापिक्सल किंवा ६४-मेगापिक्सल कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोन ५००० mAh बॅटरी सपोर्टसह दिला जाऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nQQiSc

Comments

clue frame