Smartwatch: ब्लड ऑक्सिजन मॉनिटर फीचरसह ‘या’ कंपनीची शानदार स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत २ हजार रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड ने भारतात आपली नवीन लाँच केली आहे. या स्मार्टवॉचला कंपनीने नाव दिले आहे. कमी किंमतीत स्मार्टवॉच खरेदी करू इच्छित असलेल्या ग्राहकांसाठी या वॉचला सादर केले आहे. वाचा: Tagg Verve Active चे स्पेसिफिकेशन्स Tagg Verve Active मध्ये १.७ इंच एलसीडी स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन २४०x२८० पिक्सल आहे. याचे स्क्रीन ब्राइटनेस ५०० निट्स आणि स्क्रीन टू बॉडी रेशियो ८० टक्के आहे. Companion मोबाइल अ‍ॅपद्वारे यूजर्स वॉच फेसला कस्टमाइज देखील करू शकतात. याचे स्ट्रॅप इंटरचेंजबल आहेत. यामुळे यूजर्स कधीही नवीन लूकसह वॉच वापरू शकतात. यात बाजूला नेव्हिगेशनसाठी बटन दिले आहे. Tagg Verve Active चे वजन फक्त ३८ ग्रॅम आहे. वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी याला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन कंसन्ट्रेशनसाठी SpO२ मॉनिटर मिळते. यात हार्ट रेट सेंसर, बॉडी टेंपरेचर ट्रॅकिंग आणि ब्लड प्रेशर मॅपिंग सारखे सेंसर्स देखील मिळतात. यूजर्स या स्मार्टवॉचद्वारे आपल्या डीप स्लीप आणि लाइट स्लीप सायकलला ट्रॅक करू शकतात. यामध्ये २४ पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड्सचा सपोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये वॉचची बॅटरी ८ दिवस टिकते. Tagg Verve Active ची किंमत Tagg Verve Active ची विक्री सुरू झाली आहे. वॉचला ३,९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. परंतु, १,८९९ रुपये इंट्रोडक्टरी किंमतीत खरेदी करू शकता. वॉच ग्रे, ग्रीन, ब्लॅक, पर्पल आणि गोल्ड रंगात उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3npO8ZS

Comments

clue frame