Smartphone: Vivo चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, स्वस्त किंमतीत मिळणार दमदार फीचर्स

नवी दिल्ली: ने भारतीय बाजारात आपला नवीन लाँच केला आहे. कंपनीने Y-Series अंतर्गत आपला नवीन हँडसेट ला लाँच केले आहे. हा फोन मिडनाइट ब्लू आणि डायमंड ग्लो या २ रंगात येतो. वाचा: Vivo Y21A स्मार्टफोन २४ जानेवारीपासून इंडिया ई-स्टोर आणि सर्व पार्टनर रिटेल स्टोर्सवर विक्रीसाटी उपलब्ध झाला आहे. विवोने या फोनला खास तरुणांसाठी लाँच केले असून, ज्यांना शानदार एक्सपीरियन्स आणि सुपीरियर टेक्नोलॉजी हवी आहे. Vivo Y21A स्मार्टफोनची किंमत Vivo Y21A स्मार्टफोनची किंमत १३,९९० रुपये आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनमध्ये ६.५१ इंच एचडी+ Halo डिस्प्ले दिला आहे. शानदार व्ह्यूइंग एक्सपीरियन्ससाठी यात इन-सेल टेक्नोलॉजी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये Eye Protection Mode देखील दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, हे यूजर्सच्या व्ह्यूइंग एक्सपीरियन्सला अधिक शानदार बनवते. या स्मार्टफोनची जाडी ८.० एमएम आणि वजन १८२ ग्रॅम आहे. Vivo Y21A स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी १८ वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. स्मार्टफोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगचा देखील सपोर्ट मिळतो. म्हणजेच, गरज पडल्यास हा स्मार्टफोन पॉवर बँकचे काम करेल. फोनमध्ये रियरला १३ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सुपर मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फी कॅमेऱ्यात एआय ब्यूटीफिकेशन मोड दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nXLR8l

Comments

clue frame