Smart TV Offers: फ्लिपकार्ट सेलचा धमाका, ५५ इंच स्मार्ट टीव्ही निम्म्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Big Saving Days Sale आजपासून सुरू झाला आहे. हा सेल २२ जानेवारीपर्यंत चालेल. ६ दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर धमाकेदार ऑफर्स मिळत आहे. सेलमध्ये ५५ इंच स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. या सेलमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या स्मार्ट टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Cybersound 55 inch Blaupunkt Cybersound 55 inch स्मार्ट टीव्हीला ५५,९९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. मात्र, सेलमध्ये टीव्ही पक्त ३६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास फोनला २४,७४९ रुपयात खरेदी करू शकता. 55 inch Smart Android TV iFFALCON च्या ५५ इंच टीव्हीची किंमत ७०,९९० रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त ३५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. आयसीसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय ११ हजार रुपये एक्सचेंज ऑफर मिळते. P615 55 inch Smart Android TV TCL P615 55 inch स्मार्ट टीव्हीची किंमत ७५,९९० रुपये आहे. परंतु, सेलमध्ये फक्त ३८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट आणि ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. acer Boundless Series 55 inch Smart Android TV या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ५४,९९० रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ३४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर देखील ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट आणि ११ हजार रुपये एक्सचेंज ऑफर मिळते. Thomson OATHPRO Series 55 inch Smart Android TV या स्मार्ट टीव्हीची किंमत ४९,९९९ रुपये असून, मात्र सेलमध्ये ३४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीवर देखील आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळते. तसेच, ११ हजार रुपये एक्सचेंज ऑफर मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ttmK0O

Comments

clue frame