नवी दिल्ली: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात घरासाठी नवीन Android Tv खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. अॅमेझॉनवर मोठ्या स्क्रीनच्या Redmi टीव्ही मॉडेलवर ग्राहकांसाठी मोठी सवलत देण्यात येत आहे. अनेक अॅमेझॉन ऑफर देखील दिल्या जात आहेत, ज्याच्या मदतीने ग्राहक या ५० इंच स्मार्ट टीव्ही मॉडेलवर पैसे वाचवू शकतात. वाचा: ५० इंच रेडमी एलईडी टीव्ही: वैशिष्ट्ये: डिस्प्ले: या एलईडी टीव्ही मॉडेलला डॉल्बी व्हिजन, HDR 10 प्लस, विविड पिक्चर इंजिन, 4K अल्ट्रा HD म्हणजेच ६० Hz रिफ्रेश रेटसह ३८४० x २१६० पिक्सेल रिझोल्यूशन मिळेल. कनेक्टिव्हिटी: नवीन गेमिंग कन्सोल, ब्लू-रे प्लेयर्स, सेट-टॉप बॉक्ससाठी ३ HDMI पोर्ट प्रदान केले आहेत. त्याच वेळी, हार्ड ड्राइव्हस् आणि इतर USB उपकरणे कनेक्ट करण्यासाठी २ USB पोर्ट आहेत. याशिवाय ब्लूटूथ व्हर्जन ५.० सपोर्ट देण्यात आला आहे. आवाजाबद्दल बद्दल बोलायचे झाल्यास, डॉल्बी ऑडिओ, डीटीएस-एचडी आणि डीटीएस व्हर्च्युअल एक्स सपोर्टसह ३० W आउटपुट उपलब्ध असेल. Android TV 10 व्यतिरिक्त, Chromecast, Amazon Prime Video, Netflix आणि Disney + Hotstar सारखे OTT अॅप्स समर्थित आहेत. Redmi 50 inch 4K Ultra Smart LED TV X50 (L50M6-RA) हे टीव्ही मॉडेल Amazon वर ४४,९९९ (MRP) ऐवजी ७,००० च्या सवलतीसह म्हणजेच पूर्ण १६ टक्के सूट देऊन ३७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. Amazon ऑफर: जुन्या टीव्हीवर ग्राहकांना ४०१० पर्यंत सूट, सिटीबँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर २५०० ची इन्स्टंट सूट (किमान खरेदी ३३ हजार), नॉन-ईएमआय व्यवहारांवर २००० ची इन्स्टंट सूट, HSBC कॅशबॅक कार्डवर ५ टक्के सूट, अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहे . निवडक कार्ड्सवरील ग्राहकांच्या सोयीसाठी, व्याजाशिवाय EMI ची सुविधा देखील मिळेल. जुन्या टीव्हीची पूर्ण किंमत ४०१० रुपये मिळाली तर त्याची किंमत रु.३७,९९९ - रु ४०१० = रु. ३३, ९८९ होईल. Citibank क्रेडिट कार्डवर किमान ३३ हजारांच्या खरेदीवर २५०० ची सूट देण्यात येत आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q5efXy
Comments
Post a Comment