Redmi Offers : रिचार्जच्या किमतीत खरेदी करा Redmi चा सर्वात स्टायलिश स्मार्टफोन, फोनची लाँच किंमत १६,९९८ रुपये, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Amazon वर मोबाईल सेव्हिंग डेज सेल सुरू असून तो आज संपणार आहे. सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. जर, तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आजच योग्य संधी आहे. रेडमी, ओप्पो, नोकियासह अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन अतिशय स्वस्तात तुम्हाला यादरम्यान कमी किमतीत खरेदी करता येतील. यात Redmi च्या स्मार्टफोनवरही खूप मोठी सूट आहे. तुम्ही १७ हजार रुपये किमतीचा फक्त ४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. वाचा: Redmi Note 10S ऑफर आणि सूट: Redmi Note 10S ची लाँच किंमत १६,९९८ रुपये आहे. परंतु, Amazon सेलमध्ये हा फोन १४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर १,९९९ रुपयांची सूट दिली जात आहे. त्यानंतर अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत. ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल. Redmi Note 10S बँक ऑफर: तुम्ही Redmi Note 10S खरेदी करण्यासाठी बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला १,२५० रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच फोनची किंमत १३,७४९ रुपये असेल. Redmi Note 10S वर एक्सचेंज ऑफर देखील आहे. Redmi Note 10S एक्सचेंज ऑफर: Redmi Note 10S वर १३,२५० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला खूप सूट मिळू शकते. पण, फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच तुम्हाला १३, २५० एक्सचेंज ऑफ मिळेल. जर तुम्ही पूर्ण ऑफ मिळवण्यात यशस्वी झालात तर, फोनची किंमत फक्त ४९९ रुपये असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tTVecQ

Comments

clue frame