Recharge Plans: एकदाच रिचार्ज करा आणि मिळवा वर्षभराची वैधता, ३६५ दिवस वापरा ९०० जीबीपेक्षा अधिक डेटा; पाहा प्लान्स
नवी दिल्ली : जास्त दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सला यूजर्सची मोठी पसंती मिळत आहे. टेलिकॉम कंपन्या , आणि वोडाफोन आयडियाकडे ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे काही शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये ९०० जीबीपेक्षा अधिक डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स मिळतात. या तिन्ही कंपन्यांकडे असलेल्या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: रिलायन्स जिओचा २,९९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा यानुसार एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय दररोज १०० एसएमएस, देशभरात अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. एअरटेलचा २,९९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये ३६५ दिवस दररोज २ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण ७३० जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ३० दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोफत ट्रायल मिळते. वोडाफोन-आयडियाचा ३,०९९ रुपयांचा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. प्लानमध्ये एक वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट सारखे अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतात. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GeymIm
Comments
Post a Comment