Recharge Plans: जिओचा धमाकेदार प्लान, ६०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत १०० जीबी डेटासह Amazon Prime, Netflix मोफत

नवी दिल्ली : भारतातील प्रमुख खासगी टेलिकॉम कंपन्या , आणि वोडाफोन आयडियाने काही दिवसांपूर्वी प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना मोठा झटका दिला होता. त्यानंतर ग्राहक कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स शोधत आहे. कंपन्या देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही शानदार प्लान्स आहेत. टेलिकॉम कंपनी Reliance कडे असाच एक प्लान असून, ज्यात जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. वाचा: Reliance Jio कडे ५९९ रुपये किंमतीचा प्लान असून, यात डेटासह ओटीटी बेनिफिट्स देखील मिळतात. रिलायन्सच्या या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन अ‍ॅपचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. Jio चा ५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजरला एकूण १०० जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर प्रती जीबीसाठी १० रुपये आकारले जातात. या प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे यात यूजर्सला २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची देखील सुविधा मिळते. अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा या प्लानमध्ये यूजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिले जात आहे. याशिवाय प्लानमध्ये एक अतिरिक्त सिम कार्ड देखील मिळेल. Netflix, Disney+ Hotstar मोफत ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजरला नेटफ्लिक्ससह १ वर्षासाठी Video आणि Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचा देखील मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. दरम्यान, हा प्लान घेणाऱ्या यूजर्सकडे ९९ रुपये किंमतीचे जिओप्राइम असणे गरजेचे आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3IbjtXX

Comments

clue frame