Recharge Plan: कमी किंमतीत जास्त फायदे, Airtel-Jio-Vi च्या प्लान्समध्ये दररोज २ जीबी डेटासह मिळेल अनेक बेनिफिट्स

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या , आणि वीआयचे दररोज २ जीबी डेटासह येणारे प्लान्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. एअरटेलकडे २ जीबी डेटासह येणारे काही शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. एअरटेलच्या २ जीबी डेटासह येणाऱ्या सुरुवाती प्लानची किंमत १७९ रुपये असून, या प्लानची वैधता २८ दिवस आहे. वाचा: याशिवाय ३५९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस, ५४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६, ८३८ रुपयांची वैधता ५६ दिवस वैधता, ८३९ रुपयांची वैधता ८४ दिवस, १,७९९ रुपयांची वैधता ३६५ दिवस, २,९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस आणि ३,३५९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लान्समध्ये दररोज १०० एसएमएस, दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. याशिवाय प्लानमध्ये ३० दिवसांसाठी सबस्क्रिप्शन, मोबाइल पॅक आणि एअरटेल थँक्स अ‍ॅपची सुविधा मिळते. ८३८ रुपये आणि ३,३५९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. च्या २ जीबी डेटासह येणाऱ्या प्लानची सुरुवाती किंमत २४९ रुपये आहे. या प्लानमध्ये २३ दिवसांची वैधता मिळते. तसेच, २९९ रुपयात २८ दिवस, ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवस, ५३३ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवस, ७१९ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवस, ७९९ रुपयात ५६ दिवस, १,०६६ रुपयात ८४ दिवस, २,८७९ रुपयात ३६५ दिवस आणि ३,११९ रुपयात ३६५ दिवसाची वैधता मिळते. या सर्व प्लान्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, दररोज २ जीबी डेटा आणि जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. तसेच, ४९९ रुपये, ७९९ रुपये, १,०६६ रुपये आणि ३,११९ रुपयांच्या प्लानमध्ये वर्षभरासाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. Vodafone Idea (Vi) च्या दररोज २ जीबी डेटासह येणाऱ्या प्लानची सुरुवाती किंमत १७९ रुपये आहे. प्लानची वैधता २८ दिवस आहे. तसेच, ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवस, ५३९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवस आणि ८३९ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय प्लान्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणिVi Movies and TV चे सबस्क्रिप्शन मिळते. शेवटच्या तीन प्लानमध्ये Hero Unlimited आणि Binge All Night चा देखील फायदा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tzYg63

Comments

clue frame