Prepaid Plans: जिओचे भन्नाट प्लान्स! या स्वस्त रिचार्जमध्ये मिळेल ५० जीबीपर्यंत डेटा, किंमत फक्त १८१ रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे अनेकजण घरून काम करत आहेत. अशा स्थितीमध्ये फास्ट इंटरनेटची गरज भासते. ब्रॉडबँड कनेक्शन नसल्यास मोबाइल डेटा वापरून काम करता येते. घरून काम करणाऱ्या यूजर्सच्या सुविधेसाठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे असेच काही शानदार प्लान्स आहे. कंपनीच्या या प्लान्समध्ये ५० जीबीपर्यंत डेटा मिळेल. या प्लान्सची किंमत देखील खूप कमी आहे. याविषयी जाणून घेऊया. वाचा: जिओचा १८१ रुपयांचा प्लान जिओच्या १८१ रुपयांच्या प्लानची वैधता ३० दिवस आहे. या प्लानमध्ये केवळ डेटा मिळतो. प्लानमध्ये यूजर्सला डेली लिमिटशिवाय एकूण ३० जीबी डेटा मिळतो. तुम्ही जर घरून काम करत असाल तर हा डेटा प्लान तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. जिओचा २४१ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता देखील ३० दिव आहे. या प्लानमध्ये केवळ डेटा बेनिफिट्स मिळतात. प्लानमध्ये कोणत्याही लिमिटशिवाय एकूण ४० जीबी डेटा मिळतो. यूजर्स हा डेटा एकाच दिवशी वापरू शकतात. यात इतर बेनिफिट्स मिळत नाहीत. जिओचा ३०१ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला ३० दिवसांची वैधता मिळेल. हा देखील एक डेटा-ओनली प्लान असून, यात एकूण ५० जीबी डेटा मिळतो. यूजर्स हा डेटा कोणत्याही लिमिटशिवाय वापरू शकता. यात कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स मात्र मिळत नाहीत. वर्क फ्रॉम होम यूजर्ससाठी हा प्लान चांगला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hSrFabUdQ

Comments

clue frame