OnePlus 10 Pro: लाँच आधीच OnePlus 10 Pro ची किंमत लीक, मोजावे लागतील इतके पैसे, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: चीनमध्ये ११ जानेवारीला एन्ट्री करणार आहे. ग्राहकांमध्ये या फोनविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत असून फोनचे काही फीचर्स लाँचपूर्वीच समोर आले आहे . लाँच पूर्वी, एका टिपस्टरने या आगामी फोनची किंमत देखील लीक केली आहे. OnePlus 10 Pro चे काही फोटो देखील समोर आले आहेत. यामध्ये Hasselblad ऑपरेटेड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. OnePlus 10 Pro ची संभाव्य किंमत जाणून घेऊया. वाचा: OnePlus 10 Pro ची अपेक्षित किंमत: OnePlus 10 Pro च्या तीन प्रकारांची किंमत ६०,००० रुपयांपेक्षा कमी असू शकते. त्याचा पहिला प्रकार ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह येईल. दुसरा ८ GB RAM आणि २५६ GB स्टोरेजसह येईल. त्याच वेळी, तिसरा १२ GB RAM आणि २५६ GB स्टोरेजसह येईल. JD.com च्या मते, बेस व्हेरिएंटची किंमत CNY ३,००० ते ३,९९९ ( ३५,००० ते ४६,६०० रुपयांच्या ) दरम्यान असू शकते. त्याच वेळी, हाय-एंड व्हेरिएंटची किंमत CNY ४,००० ते ४,९९९ ( ४६,६०० ते ५८,३०० रुपये) असू शकते. एका टिपस्टरनुसार, ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटसह OnePlus 10 Pro च्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY ३,९९९ असेल. तर, ८ GB RAM आणि २५६ GB स्टोरेजची किंमत CNY ४,५९९ (अंदाजे रुपये ५३,६००) असेल. टॉप-ऑफ-द-लाइन १२ GB RAM आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY ४,९९९ असेल. OnePlus 10 Pro ची वैशिष्ट्ये: लीक्सनुसार, OnePlus 10 Pro मध्ये HasselBlad ब्रँडिंगसह कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच, 2K वक्र AMOLED डिस्प्ले यामध्ये मिळू शकतो. चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, ५० W वायरलेस चार्जिंग आणि ८० W वायर्ड चार्जिंग मिळेल असेही सांगितले जात आहे. तसेच Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC दिले जाऊ शकते. तसेच, युर्जसना ३२ MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n7IqeS

Comments

clue frame