Jio Plans: वर्षाला एकदाच करा रिचार्ज! १०००GB डेटा आणि मोफत कॉलिंग, Jio चे ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे 'हे' प्लान एकदा पाहाच

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी कडे २८ दिवसांपासून ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स आहेत. ग्राहकांची वर्षभराच्या प्लान्सला देखील पसंती मिळताना दिसत आहे. या प्लान्समुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. जिओच्या या प्लान्समध्ये १,०९५ जीबीपर्यंत डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स दिले जात आहे. जिओच्या या वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचा: जिओचा २,८७९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. दरमहिन्याचा खर्च पाहिल्यास तुम्हाला महिन्याला २३९.९ रुपये खर्च येईल. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा यानुसार एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जिओचा ३,११९ रुपयांचा प्लान जिओच्या ३,११९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटासह अतिरिक्त १० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण ७४० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये महिन्याला २५९.९ रुपये खर्च येतो. तसेच, १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शन, दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. रिलायन्स जिओचा २,९९९ रुपयांचा प्लान जिओच्या २,९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच, प्लानमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये महिन्याचा खर्च २४९.९ रुपये आहे. या प्लानमध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. रिलायन्स जिओचा ४,१९९ रुपयांचा प्लान जिओच्या ४,१९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जात आहे. प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. यात एकूण १,०९५ रुपये डेटा मिळतो. या प्लानचा महिन्याचा खर्च ३४९.९ रुपये आहे. याशिवाय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33AHTf5

Comments

clue frame