iPhone SE 3 : लाँच आधीच iPhone SE 3 ची किंमत लीक, युजर्सना मिळू शकतात हे जबरदस्त फीचर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: iPhone ची युजर्समध्ये प्रचंड क्रेझ असून प्रत्येकालाच खरेदी करायची इच्छा असते. अॅपल ट्रॅकर मार्क गुरमनने अलीकडील न्यूजलेटरच्या माध्यमातून सांगितले आहे की, iPhone SE3 लाँच करू शकतो. हा हँडसेट मार्च किंवा एप्रिल २०२२ मध्ये लाँच केला जाऊ शकतो. Apple च्या या वर्षातील पहिल्या कार्यक्रमादरम्यान हे डिव्हाईस लाँच होण्याची अपेक्षा आहे. डिव्हाइसचे नाव किंवा iPhone SE 2022 असेल हे अद्याप कन्फर्म नाही. वाचा: नवीन iPhone SE ची किंमत काय असेल? लीक्सनुसार, iPhone SE किंवा iPhone SE 2022 ची किंमत सुमारे $४०० म्हणजेच जवळपास २९,५९० रुपये असू शकते. किंमत पाहता हा फोन अॅपल प्रेमींना भुरळ घालू शकतो असे म्हणता येईल. पहिला iPhone SE २०१६ मध्ये लाँच झाला होता. ज्या युजर्सना जास्त पैसे खर्च करायचे नाहीत त्यांना आकर्षित करण्यासाठी iPhone SE डिझाइन करण्यात आले होते. iPhone 6S आणि 6S Plus सह चालणारा हा स्वस्त पर्याय होता. Apple ने २०२० मध्ये iPhone SE 2 सह याची पुनरावृत्ती केली. यानंतर आता कंपनी iPhone SE 3 लाँच करण्याचा विचार करत आहे. iPhone SE 3: संभाव्य वैशिष्ट्ये: यामध्ये ४.७ -इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच समोरच्या बाजूला टच आयडी बटण देखील दिले जाऊ शकते. हे मुख्यत्वे iPhone 8 सह येते. यात ३ GB पर्यंत रॅम दिली जाऊ शकते. तसेच A15 बायोनिक चिपसेट उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. डिव्हाईस iPhone 13 सीरिजसारखे असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Fm2WhY

Comments

clue frame