iPhone Offers: १५ हजारांपेक्षा कमीमध्ये iPhone होईल तुमचा, 'या' मॉडेलवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. च्या परवडणाऱ्या हँडसेट वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. सर्व ऑफर्स एकत्र केल्यांनतर तुम्ही हा iPhone १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही ऑफर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट वर मिळेल. या फोनवर डिस्काउंट व्यतिरिक्त, फ्लिपकार्ट एक एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. पाहा डिटेल्स. वाचा: काय आहे पूर्ण ऑफर? डिव्हाइस Flipkart वर २४ टक्के सवलतीनंतर २९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विकण्यात येत आहे. ही किंमत फोनच्या ६४ GB व्हेरिएंटची आहे. फोनसोबत ६ महिन्यांसाठी Gaana Plus मेंबरशिप मोफत उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही तुमचा जुना फोन १५,८५० रुपयांपर्यंतच्या सवलतीसाठी एक्सचेंज करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही १५ हजारांपेक्षा कमी किमतीत iPhone मिळवू शकता. फोनच्या १२८ GB आणि २५६ GB मॉडेल्सवरही अशाच ऑफर देण्यात येत आहेत. Apple iPhone SE: स्पेसिफिकेशन्स Apple च्या iPhone SE मध्ये ६२५ nits कमाल ब्राइटनेससह ४.७ -इंचाचा HD LCD रेटिना डिस्प्ले आहे. थर्ड जनरेशन न्यूरल इंजिनसह A13 बायोनिक चिपवर काम करणारे स्मार्टफोन. Device तीन स्टोरेज प्रकारांमध्ये येते - ६४ GB, १२८ GB आणि २५६ GB. फोनच्या पुढील बाजूस टच आयडी देखील उपलब्ध आहे. जो, नवीन मॉडेलमध्ये दिलेला नाही. मागच्या बाजूला तुम्हाला सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये, तुम्हाला f/१.८ अपर्चरसह १२ MP रियर कॅमेरा मिळेल. जो, तुम्हाला ४ K, १०८० p आणि ७२० p मध्ये रेकॉर्ड करण्याची परवानगी देतो. iPhone SE च्या पुढील बाजूस f/२.३ अपर्चरसह ७ MP सेल्फी कॅमेरा आहे. परंतु, तुम्हाला खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात घ्यावे लागेल की पॉवर अॅडॉप्टर आणि इअरपॉड्स iPhone SE बॉक्समध्ये समाविष्ट केलेले नाहीत. Apple मार्च किंवा एप्रिलमध्ये पुढील iPhone SE 3 लाँच करेल अशी अपेक्षा आहे. परंतु, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35f3ObX

Comments

clue frame