Google Pixel 4a: ३२,००० रुपये किमतीचा Google चा हा पॉप्युलर स्मार्टफोन घरी आणा १२,००० रुपयांमध्ये, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Google चा एक अतिशय लोकप्रिय फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. Pixel 4a मध्ये ६ GB रॅम आणि १२.२ MP रियर कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत ३१,९९९ रुपये असली तरी तुम्ही डिस्काउंटसह तो केवळ १२,१४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल अंतर्गत ही सवलत दिली जात आहे. जर तुम्ही Google Pixel प्रेमी असाल तर तुम्हाला ही ऑफर नक्कीच आवडेल. जाणून घेऊया डिटेल्स. वाचा: ऑफर्स: फोनचा ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज ४,००० रुपयांच्या सवलतीसह २७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. फोनची मूळ किंमत ३१,९९९ रुपये आहे. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, सिटी क्रेडिट/डेबिट कार्ड्सद्वारे १० टक्के सूट दिली जाईल. त्याच वेळी, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात येत आहे. आता EMI बद्दल बोलूया. जर तुम्हाला पूर्ण किंमत देऊन फोन खरेदी करायचा नसेल, तर तुम्ही दरमहा ९७१ रुपये EMI भरून हा फोन घेऊ शकता. त्याच वेळी, एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे तर, जर तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तुम्हाला तो एक्सचेंज करायचा असेल, तर येथे तुम्हाला १५,८८५ रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास हा फोन तुम्हाला फक्त १२,१४९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Google Pixel 4a ची वैशिष्ट्ये: यात ५.८१ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा फोन Qualcomm Snapdragon ७३० G प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ६ GB रॅम आणि १२८ GB रॉम आहे. फोनमध्ये ३१४० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Google Pixel 4a मध्ये १२.२ MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, ८ MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GVUuHy8w4

Comments

clue frame