Flipkart Sale मध्ये ऑफर्सचा पाऊस, या प्रोडक्ट्सवर मिळतोय तगडा डिस्काउंट, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Flipkart ग्रँड गॅझेट डेज सेल सुरू झाला असून ग्राहक २६ जानेवारीपर्यंत या सेलमध्ये बंपर डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८० टक्क्यांपर्यंत मोठी सूट मिळू शकते. केवळ सवलतच नाही तर ग्राहक एक्सचेंज बोनस तसेच बँक ऑफरचा लाभ घेऊ शकतात आणि उत्पादनांच्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकतात. आम्ही तुमच्यासाठी या सेलमधील काही निवडक प्रॉडक्टस घेऊन आलो आहो. ज्यावर तुम्ही मोठी बचत करू शकता. जाणून घेऊया हे प्रॉडक्ट्स कोणते आहे आणि त्यावर किती सूट मिळत आहे. वाचा: Time Up Game Calling Inbuilt Speaker Smartwatch (Teal Strap, 40): या Smartwatch वर ५० टक्के सवलत दिली जात आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत २४९५ रुपये असून त्याची खरी किंमत ४९९९ रूपये आहे. वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला टच स्क्रीन आणि कॉलिंग फंक्शनसह ७ दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. (Metal , 128 GB) (4 GB Ram ): या दमदार स्मार्टफोनची किंमत प्रत्यक्षात १३,९९९रुपये आहे, परंतु या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर १४ टक्के बंपर डिस्काउंट मिळू शकतो, त्यानंतर या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये होईल.हा फोन ४GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह येतो. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. Boult Audio AirBass Y1 TWS Earbuds: Flipkart सेलवर इअरबड्सवर ७६ टक्के बंपर सूट दिली जात आहे, जी सर्वात जास्त आहे. या सवलतीमध्ये तुम्ही फक्त १२९९ रुपयांमध्ये इअरबड खरेदी करू शकता. इयरबड्सची मूळ किंमत ५४९९ रुपये आहे. एवढ्या मोठ्या सवलतीनंतर, तुम्ही त्यांना परवडणाऱ्या किमतीत सहज खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल सांगायचे तर डिव्हाइस फास्ट चार्ज सपोर्टसह येते, जे १० मिनिटे चार्ज करून १०० मिनिटे चालते. डिव्हाइस नवीन ब्लूटूथ ५.१ ला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rPhlOZ

Comments

clue frame