नवी दिल्ली : ने भारतात आपल्या नवीन इयरबड्सला लाँच केले आहे. कंपनीने २० तासांच्या दमदार बॅटरी लाइफसह WF-C500 TWS ला लाँच केले आहे. गोल आकार डिझाइमध्ये येतात. कंपनीचा दावा आहे की, इयरबड्सला कानांमध्ये व्यवस्थित फिट बसण्यासाठी डिझाइन केले आहे. वाचा: कंपनीचा दावा आहे की, इयरबड्स हाय-क्वालिटी ऑडिओ प्रदान करतात. यात DSEE टेक्नोलॉजी दिली आहे. Sony WF-C500 हे एक कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये येतात. इयरबड्स लहान असले तरी कानात व्यवस्थित फिट बसतात. या इयरबड्सच्या किंमत आणि स्पेसिफिकेशनविषयी जाणून घेऊया. Sony WF-C500 TWS इयरबड्सची किंमत Sony WF-C500 ला भारतात ५,९९० रुपयात किंमतीत लाँच केले आहे. हा इयरबड्स या किंमतीत Jabra Elite 3 ला टक्कर देईल. इयरबड्सला ब्लॅक, ग्रीन, ऑरेंज आणि व्हाइट रंगात खरेदी करू शकता. या बड्सला सेंटर, सोनी एक्सक्लूसिव्ह, ShopatSC.com सह सोनी रिटेल स्टोर्सवर १६ जानेवारीपासून खरेदी करता येईल. Sony WF-C500 TWS इयरबड्सचे फीचर्स Sony WF-C500 TWS इयरफोनमध्ये ५.८ एमएम ड्रायव्हर दिले आहे. हे इयरबड्स DSEE टेक्नोलॉजी डिजिटल साउंड एन्हांसमेंट इंजिनसह येतात. कंपनीचा दावा आहे की, यामुळे ऑडिओ व कॉलची क्वालिटी वाढते. यात गुगल असिस्टेंट आणि सिरीचा देखील सपोर्ट मिळतो. बड्स आयओएस आणि अँड्राइड डिव्हाइसला कनेक्ट होतात. यात Android Fast Pair आणि Swift Pair चा सपोर्ट दिला आहे. यात आवाज वाढवणे, म्यूझिक बदलणे, स्टॉप आणि प्लेसाठी बटन दिले आहे. बड्सला मोनोपॉड स्वरुपात देखील वापरू शकता. सोनीचा दावा आहे की, बड्सला एकचा चार्ज केल्यावर १० तासांची बॅटरी लाइफ मिळते. तसेच, चार्जिंग केसद्वारे १० तासांची बॅटरी लाइफ मिलेल. बड्स रिव्हर्स चार्जिंग टेक्नोलॉजीसह येतात व यामुळे १० मिनिटांच्या चार्जिंगद्वारे एक तास वापरू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fd5zrW
Comments
Post a Comment