Xiaomi Smartphone: येतोय सर्वात फास्ट चार्ज होणारा Xiaomi चा स्मार्टफोन, १५ मिनिटांत होणार फुल चार्ज, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली : चीनची लोकप्रिय कंपनी Xiaomi ६ जानेवारीला भारतात नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच करणार असून फोनमध्ये १२० W फास्ट चार्जिंग फीचर उपलब्ध असेल, असे कंपनीतर्फे यापूर्वीच सांगण्यात आले होते. आता लेटेस्ट टीझरमध्ये Xiaomi India ने खुलासा केला आहे की, यामध्ये १२० चा जबरदस्त Hz डिस्प्ले दिला जाईल. म्हणजेच फक्त चार्जिंगच नाही तर हा फोन डिस्प्लेच्या बाबतीतही खूप पॉवरफुल असेल. फोनशी संबंधित उर्वरित तपशील जाणून घेऊया. वाचा: Xiaomi 11i Hypercharge: सर्वात वेगवान चार्जिंग फोन Xiaomi 11i Hypercharge कंपनीने चीनमध्ये लाँच केलेल्या Redmi Note 11 Pro+चे रिर्ब्रँडेड व्हर्जन असण्याची अपेक्षा आहे. 11i हायपरचार्ज ग्राहकांना १२० W फास्ट-चार्जिंग सपोर्ट आणि १२० Hz डिस्प्ले यासारखी काही फ्लॅगशिप-ग्रेड वैशिष्ट्ये ऑफर करेल. १०० W पेक्षा जास्त चार्जिंग स्पीडला सपोर्ट करणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. म्हणजेच हा देशातील सर्वात जलद चार्ज होणारा फोन बनेल. कंपनीने दावा केला आहे की फोन १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. Xiaomi 11i Hypercharge: डिस्प्ले देखील मजबूत: Xiaomi 11i हायपरचार्जमध्ये पंच-होल फ्रंट स्क्रीन, स्लिम बेझल्स आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर असेल. मागील बाजूस, यात आयताकृती कॅमेरा युनिट असेल. डिव्हाइसमध्ये ६.७७ -इंच फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सेल) सुपर AMOLED स्क्रीन असेल. जे १२० Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ संरक्षणासह येईल. फोन ८ GB RAM आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेजसह MediaTek Dimensity 920 प्रोसेसरला सपोर्ट करेल. वाचा वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sxmxcx
Comments
Post a Comment