Wireless Earbuds: खूपच कमी किंमतीत लाँच झाले Noise चे शानदार इयरबड्स, मिळते दमदार बॅटरी लाइफ

नवी दिल्ली : ने भारतात आपले नवीन बजेट ट्रू वायरलेस इयरबड्सला लाँच केले आहे. कंपनीने Noise Beads True ला सादर केले असून, याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरू होईल. इयरबड्समध्ये ब्लूटूथ ५.१, १८ तासांची बॅटरी लाइफ, टाइप-सी चार्जिंग आणि आयपीएक्स५ रेटिंग मिळेल. इयरबड्सच्या किंमत, स्पेसिफिकेसन्स आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Noise Beads True Wireless Earbuds चे फीचर्स एक बजेट असून, हे चमकदार मेटेलिक फिनिश डिझाइनसह येतात. अन्य TWS प्रमाणेच हे देखील चार्जिंग केससह येतात. यात बॅटरी लेव्हलची माहिती मिळण्यासाठी एलईडी लाइट मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.१ वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि हायपर सिंक टेक्नोलॉजीचा सपोर्ट मिळतो. तसेच, अँड्राइड डिव्हाइसला फास्ट पेअरिंगचा सपोर्ट मिळतो. या बड्सचे वजन फक्त ४.५ ग्रॅम असून, हे कानात एकदम फिट बसतात. एकदा चार्ज केल्यानंतर या बड्सला ७ तासांची बॅटरी लाइफ मिळते. चार्जिंग केससह १८ तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. चार्जिंगसाठी टाइप-सी सपोर्ट मिळतो. यात सिरी आणि गुगल असिस्टेंटसह फुल टच कंट्रोल सपोर्ट मिळतो. पाणी आणि घामापासून सुरक्षेसाठी आयपीएक्स५ रेटिंग मिळाली आहे. Noise Beads True Wireless Earbuds ची किंमत Noise Beads True Wireless Earbuds ची किंमत १,४९९ रुपये आहे. ही इंट्रोडक्टरी किंमत असून, नंतर किंमत वाढून ३,४९९ रुपये होईल. ब्लॅक, व्हाइट आणि ग्रे रंगात येणाऱ्या या इयरबड्सला २४ डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3E8VdU7

Comments

clue frame