WhatsApp Features: एकच नंबर! WhatsApp वर हॉटेल बुकिंगसह किराणाही खरेदी करता येणार, येतंय हे भन्नाट फीचर
नवी दिल्ली : प्रत्येक वयोगटातील युजर्सचे आवडते App आहे. WABetaInfo कडून आलेल्या लीकनुसार, यूजर्स लवकरच व्हॉट्सअॅपवरील सर्वोत्तम सेवांचा लाभ घेऊ शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, आता यूजर्स व्हॉट्सअॅपच्या मदतीने Nearby Business सर्च करू शकणार आहेत. ही सेवा ग्राहकांना अनेक अॅप्स वापरण्यापासून वाचवेल. बहुतेक लोक या गोष्टी शोधण्यासाठी एकाधिक अॅप्स वापरतात. ज्यामध्ये स्मार्टफोनची बरीच जागा वाया जाते आणि तुमचा स्मार्टफोनही स्लो होतो. वाचा: WhatsApp बिझनेस डिरेक्टरी नावाच्या एका नवीन वैशिष्ट्यावर काम सुरु आहे. ज्यामध्ये, युजर्स जवळपास कार्यरत असलेले स्थानिक व्यवसाय शोधू शकतील आणि पुढील उपयोगासाठी त्यांचे संपर्क तपशील देऊ शकतील. या नवीन वैशिष्ट्यासह, व्हॉट्सअॅप युजर्स आता जवळपासचे किराणा दुकान, कपड्यांची दुकाने, रेस्टॉरंट्सत्चे तपशील प्लॅटफॉर्म न सोडता त्वरित व्हॉट्स अॅपवर मिळवू शकतील. WhatsApp युजर्सना हॉटेल, कपडे आणि किराणा सामान बुक करता येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, येत्या काळात याबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Google Play Store बद्दल सांगायचे तर, त्यावर किराणा सामान बुक करण्यासाठी, हॉटेल बुक करण्यासाठी आणि कपडे खरेदी करण्यासाठी अनेक अॅप्स आहेत, जे संबंधित सुविधा देतात. मात्र, व्हॉट्सअॅपवर या सेवा खरेदी करण्याचा पर्याय आल्यास बाजारात सध्या असलेल्या या अॅप्सना जोरदार स्पर्धा मिळणार हे नक्की. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pvmQmg
Comments
Post a Comment