Tecno Smartphone: फक्त ७,४९९ रुपयात लाँच झाला हा दमदार स्मार्टफोन, मिळते ५००० एमएएच बॅटरी

नवी दिल्ली : ने आपला नवीन स्वस्त Tecno Spark Go 2022 ला भारतात लाँच केले आहे. यासोबतच, कंपनीने ला लाँच केले आहे. कंपनीने Tecno Spark Go 2021 ला यावर्षाच्या सुरुवातीला लाँच केले होते. वाचाः हा आधीच्या मॉडेलचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यात वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले नॉच दिला आहे. तसेच, रियरला ड्यूल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सेल्फी फ्लॅश मिळेल. Tecno Spark Go 2022 ची किंमत आणि उपलब्धता Tecno Spark Go 2022 ची भारतात किंमत फक्त ७,४९९ रुपये आहे. फोनला एकमेव २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला सादर केले आहे. फोन Turquoise Cyan रंगात येतो. डिव्हाइसला ई-कॉमर्स साइट Amazon वरून खरेदी करू शकता. Tecno Spark Go 2022 चे स्पेसिफिकेशन्स ड्यूल नॅनो सिमसह येणारा Tecno Spark Go 2022 फोन अँड्राइड ११ (Go edition) आधारित HiOS ७.६ वर काम करतो. या फोनमध्ये ६.५२ इंच एचडी+ स्क्रीन दिली असून, याचा टच सँपलिंग रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी Tecno Spark Go 2022 मध्ये रियरला ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे. सोबत एक एआय लेंस दिली आहे. फोनमध्ये फ्रंटला सेल्फीसाठी एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Tecno Spark Go 2022 मध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४G VoLTE, Wi-Fi, Bluetooth, Micro-USB आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळेल. वाचाः वाचाः वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pEvCy9

Comments

clue frame