नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म वर सुरू आहे. ३० डिसेंबरला समाप्त होणाऱ्या या सेलचा एक दिवस वाढवण्यात आला आहे. हा सेल आता ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता समाप्त होईल. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनची किंमत ३५,९९० रुपये असून, सेलमध्ये फक्त १३,०४० रुपयात खरेदी करू शकता. वाचा: Oppo च्या ५G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट Oppo Reno6 5G ची किंमत ३५,९९० रुपये आहे. मात्र, सेलमध्ये १६ टक्के डिस्काउंटनंतर २९,९९० रुपयात उपलब्ध आहे. या फोनवर १५,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास या फोनला १४,५४० रुपयात खरेदी करू शकता. ही ऑफर जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. बँक ऑफर एक्सचेंज ऑफरसह बँक ऑफरचा देखील फायदा मिळेल. स्मार्टफोनला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास १,५०० रुपये कॅशबॅक मिळेल. यामुळे फोनची किंमत १४,५४० रुपयांवरून १३,०४० रुपयांवर येईल. अशाप्रकारे ३६ हजार रुपयांचा फोन फक्त १३ हजार रुपयात खरेदी करता येईल. Oppo Reno6 5G चे फीचर्स Oppo Reno6 5G मध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ९०० चिपसेटसह ६.४३ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आणि ४,३०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी फक्त २८ मिनिटात फुल चार्ज होते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सल आणि तिसरा २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zdpyQo
Comments
Post a Comment