Smartphone Offers: भन्नाट ऑफर! फक्त २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता हे दमदार स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : Big Saving Days सेलमध्ये अनेक शानदार स्मार्टफोन्सवर डिस्काउंटचा लाभ मिळत आहे. हा सेल २१ डिसेंबरपर्यंत चालणार असून, या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन्सला २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. वाचा: हॉट 10 प्ले फोनची किंमत ९,९९९ रुपये असून, फ्लिपकार्टवर ७,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनला अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ४०० रुपयांची बचत होईल. तसेच, ७,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. अशाप्रकारे तुम्ही या फोनला १९९ रुपयात खरेदी करू शकता. C11 2021 फोनची किंमत ७,९९९ रुपये असून, सेलमध्ये ७,४९९ रुपात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ३७५ रुपये आणि ६,९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. अशाप्रकारे फोनला १७४ रुपयात खरेदी करू शकता. 9i ६४ जीबी स्टोरेजसह येणारा हा फोन ८,४९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनला फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट करून खरेदी केल्यास ४२५ रुपये कॅशबॅक मिळेल. तसेच, ७,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. अशाप्रकारे हा फोन केवळ १७४ रुपयात तुमचा होईल. मोटो G31 फोनचे ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज १२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. तसेच, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ६५० रुपयांची बचत होईल. तसेच, १२,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. अशाप्रकारे फोनला फक्त १४९ रुपयात खरेदी करता येईल. सॅमसंग गॅलेक्सी F12 हा फोन फ्लिकार्टवर ११,४९९ रुपयात खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५७५ रुपये बचत होईल. फोनवर १०,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. अशाप्रकारे फोन फक्त २४ रुपयात तुमचा होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3J5fYn5

Comments

clue frame