Smartphone Offers: ९ हजार रुपये स्वस्तात खरेदी करा Oppo चा हा पॉवरफुल स्मार्टफोन, फोनमध्ये ६ कॅमेरे,पाहा डिटेल्स
नवी दिल्ली : ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर स्मार्टफोन इयर एंड सेल सुरू आहे. हा सेल २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१ पर्यंत सुरु राहणार असून यादरम्यान ग्राहकांना अनेक स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येतील . या सेलमध्ये वर ९ हजार रुपयांची सूट मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही ऑफरची गरज नाही. संपूर्ण तपशील जाणून घेऊया. वाचा: किंमत आणि ऑफर: Oppo चा हा स्मार्टफोन फक्त एकाच प्रकारात येतो – ८ GB RAM + १२८ GB स्टोरेज. फोनची MRP २५,९९० रुपये आहे. फ्लिपकार्टवर फोन १६,९९० रुपयांना विकला जात आहे. म्हणजेच किमतीत थेट ९००० रुपयांची सूट. जर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर पाहिले तर तिथे देखील फोन १९,९९० रुपयांना उपलब्ध आहे.. फ्लिपकार्टवर ही किंमत कोणत्याही ऑफरशिवाय आहे. Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स: Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १०८० x२४०० पिक्सेल रिझोल्यूशन आणि ६० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये MediaTek Helio P95 प्रोसेसरसह ८ GB रॅम आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज २५६ GB पर्यंत वाढवता येते. सुरक्षेसाठी फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. मिळतात ६ कॅमेरे: फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह चार मागील कॅमेरे आहेत. यात ४८-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ -मेगापिक्सेलचा दुय्यम सेन्सर आणि दोन २ मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर आहेत. त्याच वेळी, सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेल + २ मेगापिक्सेलचा ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. अशा प्रकारे फोनमध्ये एकूण ६ कॅमेरे देण्यात आले आहेत. यात ४,०१५ mAh बॅटरी आहे, जी ३० W VOOC फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ervbkt
Comments
Post a Comment