Smartphone Offers : २ हजार रुपये स्वस्तात घरी आणा ५० MP कॅमेरावाला Realme चा हा पॉवरफुल स्मार्टफोन, पाहा फीचर्स
नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर Year End स्मार्टफोन सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही चा लोकप्रिय बजेट स्मार्टफोन Realme 8i देखील उत्तम ऑफर्समध्ये उपलब्ध आहे . ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये Realme च्या या फोनवर २,००० रुपयांची सूट दिली जात आहे. सवलतीनंतर, त्याच्या ४ GB RAM + ६४ GB इंटर्नल स्टोरेज वेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये इतकी होईल . तसेच, ६ जीबी रॅम + १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज वेरिएंट १७,९९९ रुपयांऐवजी १५,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. वाचा: फोन खरेदी करताना तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला ५% अनलिमिटेड कॅशबॅकचा लाभ मिळेल. याशिवाय तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये Realme 8i खरेदी केल्यास १५,४५० रुपयांपर्यंतचा अधिक फायदा मिळू शकतो. Realme 8i ची वैशिष्ट्ये: फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. डिस्प्ले १८० Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट आणि १२० Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन ६ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये MediaTek Helio G96 ऑक्टा-कोर चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी realme 8i फोनला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात २ मेगापिक्सेल मोनोक्रोम पोर्ट्रेट आणि ५० मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला १६-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. २५६ GB पर्यंत microSD कार्डला सपोर्ट करणारा, हा फोन ५००० mAh बॅटरीने समर्थित आहे, जो १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z2LGwO
Comments
Post a Comment