Reliance Jio: १ रुपयांच्या प्लानवर Jio चा यू-टर्न, बेनिफिट्समध्ये केला मोठा बदल; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ने यूजर्सला मोठा झटका दिला आहे. कंपनीने १५ डिसेंबरला आपला सर्वात स्वस्त लाँच केला होता. कंपनीने १ रुपयांचा प्लान सादर केला होता. या प्लानची वैधता ३० दिवस होती व १०० एमबी डेटा ऑफर दिला जात होता. मात्र, आता अचानक प्लानमध्ये बदल केला आहे. वाचा: कंपनीने एक रुपयांच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये मोठा बदल केला आहे. रिपोर्टनुसार, आता कंपनी प्लानमध्ये केवळ १ दिवसांची वैधता देत आहे व यात १० एमबी डेटा मिळेल. जिओच्या My मोबाइल अ‍ॅपमध्ये दिलेल्या ४जी डेटा वाउचर सेक्शनमध्ये हा प्लान लिस्ट केला आहे. वॅल्यू कॅटेगरीमध्ये 'Other Plans' मध्ये हा प्लान पाहू शकता. अ‍ॅपमध्ये या प्लानला 'Training Plan' म्हटले आहे. जिओने एका दिवसात यू-टर्न घेतला आहे. आता प्लानमध्ये केवळ १ दिवसांची वैधता व १० एमबी डेटा ऑफर करत आहे. जिओ यूजर्सला १५ रुपयांचा ४जी डेटा वाउचर ऑफर करतो. या प्लानमध्ये यूजर्सला १ जीबी हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. तुम्ही जर १ रुपयांच्या प्लानद्वारे १० वेळा रिचार्ज केल्यास केवळ १०० एमबी डेटा मिळेल. अशात १५ रुपयांचा पॅक बेस्ट ठरतो. जिओ यूजर्सला सर्वात स्वस्त डेटा पॅक ऑफर करत आहे. एअरटेलचा सर्वात स्वस्त डेटा पॅक ५८ रुपयांचा असून, यात ३ जीबी डेटा मिळतो. याची वैधता तुमच्या सध्याच्या प्लान एवढी असेल. तर वीआयकडे १९ रुपयांचा डेटा वाउटर आहे. यात २४ तासांसाठी १ जीबी डेटा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GKGjoI

Comments

clue frame