Prepaid Plans: २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे स्वस्त प्लान्स, १५५ रुपये सुरुवाती किंमतीत मिळेल डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या रिलायन्स , आणि वोडाफोन आयडियाकडे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे अनेक प्लान्स आहेत. कंपन्यांकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे काही प्लान्स असून, या प्लानमध्ये अनेक फायदे मिळतात. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Reliance चा २८ दिवसांचा प्लान रिलायन्स जिओच्या २८ दिवसांच्या प्लानची वैधता १५५ रुपये आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. यामध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. कंपनीकडे २०९ रुपयांचा प्लान आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. चा २८ दिवसांचा प्लान Airtel च्या २८ दिवसांच्या प्लानची किंमत १७९ रुपये आहे. यामध्ये एकूण २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज ३०० एसएमएसची सुविधा मिळते. प्राइम व्हिडिओ फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्यूझिकचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. कंपनीकडे २६५ रुपयांचा प्लान असून, यात दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच, प्राइम व्हिडिओचे फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्यूझिकचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. Vodafone Idea चा २८ दिवसांचा प्लान वीआयकडे २८ दिवस वैधतेसह येणारा १७९ रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा, मोफत कॉलिंग आणि ३०० एसएमएससह movies and TV चा फायदा मिळतो. Vi कडे २६९ रुपयांचा देखील प्लान आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Vi movies and TV बेसिकचा अ‍ॅक्सिस मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e9Ddyi

Comments

clue frame