OnePlus 10 Pro: कन्फर्म ! या दिवशी होणार OnePlus 10 Pro लाँच, मिळतील ८० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह अनेक फीचर्स, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित स्मार्टफोन जानेवारीमध्ये लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांनी मंगळवारी दिली. फ्लॅगशिप फोनबद्दल, असे मानले जात आहे की, हा OnePlus 9 Pro चा उत्तराधिकारी असेल. तसेच, या फोनबद्दल असेही बोलले जात आहे की, हा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. यासोबत कंपनी OnePlus 10 फोन देखील लाँच करेल. OnePlus 10 सीरिजमधील दोन्ही फोनमध्ये काही फरक असतील, जे विविध श्रेणीतील ग्राहकांना आकर्षित करतील. वाचा: OnePlus CEO Pete Lau ने चीनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट Weibo वर कन्फर्म केले की, OnePlus 10 Pro फोन जानेवारीमध्ये लाँच केला जाईल. अद्याप लाँचची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही . कंपनी ५ जानेवारी रोजी लास वेगासमध्ये CES 2022 कार्यक्रमाचे आयोजन करणार असून तेथे OnePlus 10 आणि OnePlus 10 Pro स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. दोन्ही फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतात, जे नुकतेच Qualcomm ने लाँच केले होते. OnePlus 10 Pro तपशील (अपेक्षित): OnePlus 10 Pro मध्ये एक मोठा स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो. जो, अलीकडेच लीक झालेल्या केस रेंडरमध्ये उघड झाला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये ६.७ -इंचाचा (१४४०x३२१६ पिक्सेल) QHD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो १२० Hz रिफ्रेश रेटसह येईल. स्मार्टफोन १२ GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि २५६ GB अंतर्गत UFS 3.1 स्टोरेजसह येऊ शकतो. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी असू शकते. फोन IP68 रेटिंगसह येऊ शकतो, ज्यामुळे तो धूळ आणि पाणी प्रतिरोधक बनतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3JaoVvr
Comments
Post a Comment