Moto Smartphone: ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह येणारा ‘हा’ आहे भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
नवी दिल्ली : जर तुम्ही फोटोग्राफी व त्यातही खासकरून सेल्फीसाठी शोधत असाल तर बाजारात एक २० हजारांच्या बजेटमधील चांगले डिव्हाइस उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेंसर दिला आहे. हा स्मार्टफोन असून, यामध्ये दमदार फीचर्स दिले आहेत. या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Moto G60 चे स्पेसिफिकेशन्स ड्यूल सिम (नॅनो) सपोर्टसह येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ६.९ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon ७३२G चिपसेट दिला आहे. G60 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर दिला आहे. पॉवरसाठी यात २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. Moto G60 ची किंमत Moto G60 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटच्या मॉडेलची किंत १७,९९९ रुपये आहे. फोन Frosted Champagne आणि डायनॅमिक ग्रे रंगात येतो. बाजारात ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह येणारे अन्य स्मार्टफोन्स देखील आहे. यामध्ये Samsung Galaxy A70S आणि Vivo V20 SE चा समावेश आहे. या फोन्सची क्रमशः किंमत १९,९९९ रुपये आणि १९,४९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/325FlEC
Comments
Post a Comment