नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ला ऑक्टोबरमध्ये मोठा फायदा झाला आहे. या महिन्यात कंपनीशी १७.६ लाख नवीन यूजर्स जोडले गेले आहेत. तर आणि ला मोठे नुकसान झाले असून, एकूण १४.३ लाख यूजर्सने दोन्ही कंपन्यांना सोडले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे () जारी करण्यात आले आहेत. वाचा: ट्रायच्या रिपोर्टनुसार, ४.८९ लाख यूजर्सने एअरटेलची साथ सोडली आहे. तर ९.६४ लाख यूजर्सने वोडाफोन आयडियाची साथ सोडली आहे. आता यूजर्सची संख्या ३५.३९ कोटी आहे. सप्टेंबर महिन्यात २.७४ लाख यूजर्सने एअरटेलचे कनेक्शन घेतले होते. ट्रायनुसार, यूजर्सची संख्या वाढल्याने जिओचा यूजर बेस ४२.६५ कोटी झाला आहे. तर वोडाफोन आयडियाचा यूजर बेस २६.९० कोटी आहे. जिओने सप्टेंबर महिन्यात १.९० कोटी यूजर्स गमावले होते. वीआयचा यूजर बेस २६.९० कोटी असून, सप्टेंबरमध्ये कंपनीने १०.७७ लाख यूजर्स गमावले होते. ऑक्टोबर २०२१ अखेरपर्यंत एकूण यूजर्सची संख्या ११८.९६ कोटीपर्यंत वाढली आहे. महिन्याचा वृद्धी दर ०.०४ टक्के आहे. शहरी भागातील यूजर्सची संख्या कमी होऊन ६५.८८ कोटीपर्यंत आली आहे. तर ग्रामीण भागातील संख्या ५३.०७ कोटींवर आली आहे. वायरलेस सेगमेंटमध्ये BSNL आणि MTNL ने जिओला मागे टाकले आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलची बाजारातील हिस्सेदारी ९.९१ टक्के आहे. वायरलेस सेगमेंटमध्ये जिओच्या ग्राहकांची संख्या ४२.६ कोटी आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EliYIG
Comments
Post a Comment