Jio Plan: जिओच्या 'या' प्लानमध्ये Netflix, Amazon Prime मिळवा फ्री, सोबत ७५ GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली: Jio पोस्टपेड युजर्ससाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून जिओ युजर्स आता मोफत आणि मोफत पाहू शकणार आहेत. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या प्लानमध्ये फक्त कॉलिंग आणि डेटाची सेवा घेत असाल, तर आज आम्ही त्यांना अशा प्लानबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये डेटा आणि कॉलिंग तर मिळेलच. सोबत, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल. हि युजर्ससाठी नक्कीच एक फायद्याची डील आहे. तुम्हालाही या ऑफरबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला या ऑफरशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत. जाणून घेऊया या प्लानची ऑफर काय आहे आणि त्याची किंमत किती आहे. वाचा: ऑफर जिओच्या पोस्टपेड प्लस प्लानमध्ये उपलब्ध आहे : तुम्ही या खास ऑफरचा लाभ ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये घेऊ शकता जे कॉमन कॉलिंगसाठी उपलब्ध असून डेटासोबत इतरही अधिक फायदे ऑफर करतो. या प्लानचे काय फायदे आहेत: प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचेतर तर सर्वप्रथम, या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह ७५ जीबी डेटा, १०० मेसेजेस प्रतिदिन ऑफर केले जातात. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. मोफत OTT प्लॅटफॉर्म प्रवेश: तुम्ही दर महिन्याला Netflix आणि Amazon Prime सारख्या प्लॅटफॉर्मची सदस्यता घेतली तर तर हा प्लान तुमचा बराच खर्च कमी करेल. तुम्हाला या प्लानमध्ये मोफत Netflix आणि Amazon Prime मिळतात. जे खूप लोकप्रिय आहेत. त्याच वेळी तुम्हाला Disney Hot Star, JioTV, JioSecurity आणि JioCloud मध्ये प्रवेश देखील दिला जातो. त्यामुळे हा प्लान खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर डीलपेक्षा कमी नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p97kw8
Comments
Post a Comment