iPhone Offers: iPhone च्या 'या' मॉडेलवर मिळतोय २०,००० रुपयांपर्यंतचा जबरदस्त डिस्काउंट, लगेच ऑफर पाहा
नवी दिल्ली: मध्ये स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे . iPhone 13 च्या मॉडेलवर तब्बल २०,००० रुपयांची कमाल सूट दिली जात आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर १६ पासून बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला असून तो २१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे . या काळात ग्राहकांना सवलतीत iphone 13 खरेदी करण्याची संधी मिळेल. या सवलतीमध्ये एक्सचेंज ऑफर, बँक सवलत समाविष्ट आहे. वाचा: iPhone 13 ऑफर: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये, iPhone 13 ७९,९०० रुपयांना विक्रीसाठी सादर करण्यात आला आहे. सेलमध्ये Flipkart-ब्रँडेड Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर iPhone 13 वर जास्तीत जास्त ५ टक्के सूट देण्यात येत आहे. जे सुमारे ३,९९५९ रुपये असेल. अशा परिस्थितीत iPhone 13 ची किंमत ७५,९०५ इतकी होईल. जुना iPhone बदलल्यास १५,४५० रुपयांची सूट मिळेल. अशा प्रकारे, जास्तीत जास्त एक्सचेंजेस आणि Flipkart-Axis बँक क्रेडिट कार्डचा पूर्ण लाभ घेतल्यानंतर, iPhone 13 स्मार्टफोन १९,४४५ रुपयांच्या सवलतीसह ६०,४५५ रुपयांमध्ये मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. iPhone 13: स्पेसिफिकेशन्स Apple चा नवीन 5G स्मार्टफोन iPhone 13 मध्ये ६.१ -इंचाचा मोठा डिस्प्ले आहे, जो सुपर रेटिना XDR डिस्प्ले पॅनेलसह येतो. iPhone 13 स्मार्टफोन A15 Bionic चिपसेट सह येतो. फोनमध्ये १२ MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा १२ MP आहे. फोन १२८ GB स्टोरेज पर्यायात येतो. हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे, जो डस्ट आणि वॉटर रेसिस्टंटसह येतो. iPhone 13 iOS 15 ऑपरेटिंग सिस्टम समर्थित आहे. फोनमध्ये ३२४० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, स्मार्टफोन एका चार्जवर १८ तासांच्या बॅटरी लाइफसह येतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pb6Q8H
Comments
Post a Comment