Instagram Tips: कोणतेही App डाउनलोड न करता मित्र-मैत्रिणींच्या नकळत पाहा त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीज
नवी दिल्ली : मित्र-मैत्रिणी किंवा इतर युजर्सना कळू न देता इंस्टाग्राम स्टोरीज पाहता येतात असे सांगितले तर ते कदाचित अनेकांना खरे वाटणार नाही. WhatsApp च्या विपरीत, Instagram तुम्हाला तुमच्या गोपनीयतेची काळजी घेण्याचा पर्याय देत नाही. तुम्ही एखाद्याची Instagram स्टोरी पहिली असेल तर तर अॅप त्यांना View असे दाखवते. परंतु, या मर्यादांसाठी नेहमीच एक गेट-अराउंड असते. शिवाय, अनेक युजर्सना त्यांच्या Contact लिस्ट मध्ये असलेल्याना कळू देता त्यांच्या स्टोरीज पाहायच्या असतात. हे शक्य आहे आणि यासाठी तुम्हाला App ची गरज नाही. वाचा: Transition अॅनिमेशन होल्डिंग: एखाद्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजची झलक मिळवण्यासाठी हा एक हॅक आहे. इन्स्टाग्राम अॅपवर तुम्हाला पहायची असलेली स्टोरी शोधा. ती आत्ता पाहण्यासाठी नेक्स्ट इंस्टा स्टोरी वर क्लिक करा. त्यानंतर स्टोरीला पॉज देण्यासाठी Long press करा. आता तुम्हाला मागील स्टोरीजकडे हळू हळू स्वाइप करावे लागेल. जोपर्यंत तुम्ही इन्स्टा स्टोरीज पाहणे सुरू करत नाही तोपर्यंत अॅनिमेशन खाली ड्रॅग करत रहा. अशा प्रकारे, इंस्टाग्राम "View " नोंदवत नाही आणि म्हणूनच, तुम्ही ज्यांची स्टोरी पहात आहात अशा कोणालाही View दिसणार नाही. तुम्हाला Transition खूप हळू करावे लागेल. फ्लाईट मोड: तुमचे View नोंदवल्याशिवाय इन्स्टाग्राम स्टोरीजची झलक मिळवण्याचा एअरप्लेन मोड हा एक चांगला मार्ग आहे. Instagram अॅप उघडा आणि अॅपला सर्व Stories लोड करू द्या. लोड केल्यानंतर अॅपमधून बाहेर पडा आणि बॅकग्राउंडमध्ये ठेवा. तुमच्या स्मार्टफोनवर विमान/फ्लाइट मोड चालू करा. आता Instagram अॅप उघडा आणि तुम्हाला हव्या असलेल्या वर टॅप करा. पूर्ण झाल्यावर, अॅपमधून बाहेर पडा आणि बंद करा. तुम्ही आता नेहमीप्रमाणे इंस्टाग्राम ब्राउझ करणे सुरू ठेवू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DNulIS
Comments
Post a Comment