जिओच्या Happy New Year ऑफरमध्ये फ्री मध्ये मिळवा २९ दिवसाची एक्स्ट्रा वैधता आणि डेटा

नवी दिल्लीः नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. यात आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ने सुद्धा आपल्या ची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ या ऑफर अंतर्गत आपल्या ३३६ दिवसाच्या प्लान सोबत २९ दिवसाची एक्स्ट्रा वैधता ऑफर करीत आहे. जिओचा २५४५ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आता संपूर्ण ३६५ दिवस चालणार आहे. कंपनीकडून देण्यात येत असलेली ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी आहे. सध्याचे आणि नवीन असे दोन्ही जिओ यूजर्स याचा लाभ घेऊ शकतात. जिओची ही ऑफर कधी पर्यंत वैध आहे, जाणून घ्या. कधीपर्यंत लाइव्ह आहे Happy New Year offer रिलायन्स जिओ यूजर्स या ऑफरचा लाभ २ जानेवारी २०२२ पर्यंत घेऊ शकतात. म्हणजेच यूजर्सला या प्लानचे बेनिफिट हवी असतील तर त्यांना २ जानेवारी आधी रिचार्ज करावे लागणार आहे. एक्स्ट्रा वैधता शिवाय या प्लानमध्ये कोणताही बदल होणार नाही. Rs 2,545 plan बेनिफिट रिलायन्स जिओकडून ऑल न्यू हॅप्पी न्यू ईयर ऑफर मध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंगची सुविधा दिली आहे. यात रोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी डेटा मिळतो. लिमिटेड पीरियड ऑफर अंतर्गत या प्लानमध्ये ३६५ दिवसाची वैधता दिली जात आहे. हा प्लान रिलायन्स जिओ आणि MyJio अॅपवर उपलब्ध आहे. याशिवाय, रिलायन्स जिओ यूजर्सला या प्लानमध्ये JioSuite अॅप्सचे फ्री अॅक्सेस सुद्धा मिळते. ज्यात JioCinema, JioTV, JioCloud आणि खूप साऱ्या गोष्टीचा समावेश आहे. गेल्यावर्षी हॅप्पी न्यू ईयर ऑफर मध्ये मिळत होता हा फायदा २०२० मध्ये सुद्धा रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहक आणि जिओ फोन ग्राहकांसाठी २०२० हॅप्पी न्यू ईयर ऑफर सुरू केली होती. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेली १०० एसएसएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत होते. त्यावेळी हा प्लान ३६५ दिवसाच्या वैधते सोबत येत होता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ExM5Zf

Comments

clue frame