Gmail यूजर्स सावधान! Omicron च्या नावावर होतेय मोठी फसवणूक, असे राहा सुरक्षित

नवी दिल्लीः चा नवीन व्हेरियंट ओमीक्रॉन (Omicron) मुळे संपूर्ण जगभरात भीती व्यक्त केली जात आहे. अनेक देशात हा मोठा वेगाने पसरला जात आहे. याचाच फायदा आता काही हॅकर्स उठवत आहेत. हॅकर्स जीमेल यूजर्सला च्या नावाने एक ईमेल पाठवून त्यांची फसवणूक करीत आहेत. यूकेच्या सिक्योरिटी फर्म इंडिव्हिज्युअल प्रोटेक्शन सोल्यूशन (IPS) ने जीमेल फिशिंग अटॅकची नवीन सीरीज संबंधी यूजर्संना अलर्ट राहण्याची सूचना दिली आहे. काय आहे हॅकर्सची नवीन पद्धत खरं म्हणजे जीमेलवर अनेक यूजर्सला एक फेक ईमेल पाठवला जात आहे. ज्यात दावा केला जात आहे की, नवीन PCR टेस्ट ओमीक्रॉन व्हर्जनची ओळख करणार आहे. ज्यात लोक सुरक्षित प्रवास करू शकतील. तसेच यात सेल्फ आयसोलेशनची गरज पडणार नाही. ईमेलमध्ये म्हटले की, कोणताही उशीर न करता Omicron PCR Test करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक करणे म्हणजे तुमची थेट फसवणूक करणारी आहे. तुम्ही लिंकवर क्लिक करीत असल्यास या ठिकाणी तुमचे नाव, पत्ता आणि बँक खात्याची डिटेल्स यासारखी डिटेल्स देण्यास सांगितले जाते. करोना व्हायरसचे नवीन व्हेरियंटची अशी कोणतीही टेस्ट नाही. तसेच सरकारकडून असा कोणताही ईमेल पाठवला जात नाही. आपली पर्सनल आणि बँक डिटेल्स देवून तुम्ही हॅकर्सला कोणतीही संधी देवू नका. तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते. या गोष्टी लक्षात ठेवा आरोग्य संघटनेकडून अशाप्रकारचा कोणताही ईमेल पाठवला जात नाही. जर तरीही तुम्हाला असा ईमेल मिळाल्यास ईमेल पाठवणाऱ्याचा अॅड्रेस चेक करा. ईमेल मधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. कधीही कोणतीही पर्सनल किंवा वित्तीय माहिती शेअर करू नका. अधिकृतपणे नवीन व्हेरियंट डिटेक्शन टेस्टसाठी कोणतीही चाचणी उपलब्ध नाही. त्यामुळे अशा माहितीवर जास्त लक्ष देवू नका. यासारख्या ईमेलला तत्काळ डिलिट करा. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33eWUCw

Comments

clue frame