Facebook: लॉक झाले Facebook Account? लाइव्ह चॅटद्वारे कंपनीकडे मागता येईल मदत

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनी लाइव्ह चॅट सपोर्ट आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरचे सध्या अमेरिकेत टेस्टिंग सुरू असून, याद्वारे जे यूजर्स अकाउंटला अ‍ॅक्सेस करू शकत नाही, त्यांना मदत केली जाईल. वाचा: नियमांचे उल्लंघन व इतर कारणांमुळे बंद झालेल्या अकाउंट्सला लाइव्ह चॅट फीचरचा फायदा होईल. कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, या लाइव्ह चॅटमुळे यूजर्सला मोठा फायदा होईल. यामध्ये क्रिएटर्सचा देखील समावेश आहे. पहिल्यांदाच लॉक्ड अकाउंटसाठी लाइव्ह हेल्प केली जाईल. कंपनीने याचे टेस्टिंग अमेरिकेतील यूजर्ससाठी सुरू केले आहे. ज्या यूजर्सला कंपनीकडून रिलेशनशिप मॅनेजर असाइन केलेले नाही, त्यांना या चॅट सपोर्टमुळे मदत मिळेल. कंपनीने म्हटले आहे की, क्रिएटर्सला फेसबुक लॉग इन करताना डेडिकेटेड क्रिएटर सपोर्ट साइटचा अ‍ॅक्सेस मिळेल. यूजर्स सपोर्ट एजेंटश लाइव्ह चॅट करू शकतील. यात पे-आउटपासून ते Reels फीचरबाबत प्रश्न विचारू शकतात. ने माहिती दिली की, ब्लॉकिंग यूजर आणि नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी जास्त गोष्टींचा समावेश केला जात आहे. यात पोस्टवर आलेल्या कमेंटला हाइड करण्याचा देखील समावेश असेल. हाइड पर्याय आता प्रत्येक कमेंट समोर दिसेल. सहज एका क्लिकमध्ये कमेंट हाइड करता येईल. तसेच, सर्व हाइड कमेंट एकाच जागी पाहता येतील. यासाठी कमेंट फिल्टर चेंज करावे लागेल. तसेच, कीबोर्ड ब्लॉकिंगमध्ये नंबर, चिन्ह आणि स्पेलिंगचा समावेश करून कमेंटला हाइड करता येईल. तसेच, कंपनी Moderation Assist चे देखील टेस्टिंग करत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3IJPlUL

Comments

clue frame