नवी दिल्लीः बोट (Boat) ची शानदार बोट वॉच मरकरी () भारतात लाँच करण्यात आली आहे. या वॉचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यूजर्स यात बॉडी टेंपरेचर चेक करू शकतात. याशिवाय, स्मार्टवॉच मध्ये हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर करण्याची सुविधा मिळेल. तसेच या स्मार्टवॉच मध्ये फिटनेस अॅक्टिविटीला डोळ्यासमोर ठेवून स्पोर्ट्स मोड सुद्धा देण्यात आले आहे. अन्य फीचर्स बोटने आपल्या लेटेस्ट स्मार्टवॉच बोट मरकरी मध्ये menstrual सायकल ट्रॅकर दिले आहे. जे महिलांना खूप उपयोगी पडू शकते. याशिवाय, स्मार्टवॉच मध्ये १०० हून जास्त वॉच फेस, म्यूझिक, कॅमेरा कंट्रोल आणि मेसेज कॉल नोटिफिकेशन सारखे फीचर्स मिळतील. बोट वॉच मरकरीची किंमत बोट वॉच मरकरीची खरी किंमत ६ हजार ९९० रुपये आहे. परंतु, इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत याला १ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते. ही स्मार्टवॉच ब्लॅक, ग्रीन, ब्लू, आणि क्रिम कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. या वॉचची विक्री १५ डिसेंबर पासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. बोटने यावर्षी जुलै मध्ये वॉच एक्सटेंडला लाँच केले होते. याची किंमत बजेट रेंज मध्ये आहे. या वॉच मध्ये LCD 2.5D कर्व्ड डिस्प्ले आणि ५० हून जास्त क्लाउड आधारीत वॉच फेस दिले आहे. याशिवाय, बोट वॉच एक्सटेंड मध्ये हार्ट ट्रॅकिंग, SpO2 मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंग सह १४ स्पोर्ट्स मोड्स मिळतील. यात रनिंग, सायकलिंग आणि वॉकिंग सारखी अॅक्टिविटीचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dRrNiB
Comments
Post a Comment