नवी दिल्लीः गेल्या काही महिन्यांपासून लोकांमध्ये स्मार्टवॉचची क्रेझ प्रचंड वाढली आहे. जर तुम्हाला सुद्धा एक चांगली स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एका नवीन स्मार्टवॉचची माहिती देत आहोत. हुवेई (Huawei) याच महिन्यात आपली नवीन स्मार्टवॉच लाँच करू शकते. ही स्मार्टवॉच एका चांगल्या बॅटरी लाइफसोबत कमालीचे फीचर्स सोबत येवू शकते. जाणून घ्या या संबंधी डिटेल्स. Huawei लाँच करणार नवी स्मार्टवॉच चीनी कंपनी हुवेई या महिन्यात म्हणजेच डिसेंबर मध्ये आपली नवीन स्मार्टवॉच Watch D ला लाँच करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, Huawei Watch D ला २३ डिसेंबर रोजी लाँच केले जावू शकते. परंतु, सध्या तरी कंपनीकडून यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या स्मार्टवॉच मध्ये ब्लड प्रेशर मॉनिटर सोबत अनेक खास फीचर्स मिळू शकते. ला देणार टक्कर XDA Developers च्या एका रिपोर्टनुसार, हुवेईच्या या स्मार्टवॉच मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात येणार आहेत. Samsung Galaxy Watch 4 प्रमाणे यात तुम्हाला एक ब्लड प्रेशर मॉनिटर मिळू शकते. सोबत या रिपोर्ट मध्ये हेही म्हटले की, हुवेईची स्मार्टवॉचचे फीचर सॅमसंगच्या वॉच सारखेच आहेत. परंतु, किंमतीत Huawei Watch D Samsung Galaxy Watch 4 स्वस्त आहे. Huawei Watch D चे फीचर्स सध्या कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु, लीक झालेल्या माहितीनुसार, ही स्मार्टवॉच एक रेक्टांग्युलर डिस्प्ले आणि दोन बटन्स सोबत येईल. ‘होम’ आणि ‘हेल्थ’ या दोन ऑप्शनचा वापर करण्यासाठी हे देण्यात आले आहे. यात देण्यात आलेले ब्लड प्रेशर मॉनिटर मध्ये एक खास फीचर देण्यात आले आहे. ज्यात यूजर्स पूर्णपणे ब्लड प्रेशर हिस्ट्रीला चेक करू शकते. सध्या या स्मार्टवॉच संबंधी कोणतेही माहिती कंपनीकडून देण्यात आली नसली तरी लवकरच या स्मार्टवॉच संबंधी माहिती जारी करण्यात येणार आहे. या स्मार्टवॉचला फक्त चीनमध्ये रिलीज केले जाणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dJwdrA
Comments
Post a Comment